एक तर तोंड बंद करा नाहीतर…; एसआरए घोटाळ्यांच्या आरोपांवर किशोरी पेडणेकर संतापल्या

Kishori Pednekar refutes Kirit Somaiyas allegations regarding the SRA scam

एसआरए घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याप्रकरणी पेडणेकरांविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. यासाठी दादर पोलिसांनी त्यांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलवले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्विट केले आहे. मात्र किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. तसेच दादर पोलीस स्थानकात चौकशीला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यासोबत कारण नसताना कुठल्याही शब्दाला पकडून राळ उठवत जेरीस आणलं जात आहे. एक तर तोंड बंद कर नाही तर काहीतरी वेगळ होईल.. बोलयच नाही, अस करण्याच्या त्यांचा डावाची बळी पडणार नाही, म्हणत किशोरी पेडणेकरांनी संताप व्यक्त केला आहे. किशोरी पेडणेकर आज मुंबईतील गोमाता नगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होत्या.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, दरवेळी भाजप नेते किरीट सोमय्या कारण नसताना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात. याबाबत कोर्टात केस सुरु आहे. संबंधित यंत्रणेने लिहून दिले की, माझा यात कुठेही संबंध नाही. एसआरएने आपल्या अधिकृत निवेदनामध्ये किशोरी पेडणेकरांचा यात संबंध नाही असे लिहिले तरी पण दबाव तंत्राने आवाज बंद करण्याचा प्रयत्न भाजपने कायम ठेवला आहे.

आपल्याकडे संस्कृती आहे की आपण नवरा सोडून सर्वांना भाऊ, वडीलांच्या रुपात पाहतो. एवढं असूनही भाजप वारंवार एकाच गोष्टीवर वार करत जेरीस आणण्याच प्रयत्न करत आहे. ज्यांना ज्यांना जेरीस आणले ते भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले ते पावन झाले, असा आरोपही पेडणेकरांनी केला आहे.

पेगडीपणा मला कधी जमला नाही. माझ्या आयुष्याच पुस्तक उघड आहे. माझं सासर आणि माहेर ही वरळी विधानसभा आहे. कारण नसताना कुठल्याही शब्दाला पकडून राळ उठवणं आणि जेरीस आणलं जात आहे. एक तर तोंड बंद कर नाही तर काहीतरी वेगळ होईल.. पण बोलयच नाही. असा जर त्यांचा डाव असेल तर त्याला मी बळी पडणार नाही. असही पेडणेकर म्हणाल्या आहेत.

आज मी टाळं आणि चावी पण आणली आहे. गामातामध्ये काही दुकानं आणि बालवाड्या सोसायटीच्या ताब्यात आहेत. येथील एक जरी गाळेधारक म्हणाला की, इथे किशोरी पेडणेकरांचा संबंध आहे तर मी स्वत: टाळं मारते. या टाळ्यांची चावी मीडियाला देते त्यांनी ही चावी माझ्या भावाला पोहचवावी. महाराष्ट्रात इतके प्रश्न असताना प्रत्येक बातमीला घोटाळे घोटाळे…. तुम्ही तेवढे दुध के धुले… म्हणून आज आखो देखा हाल पाहण्यासाठी आले, असं थेट इशाराचं त्यांनी दिला आहे.

एका सामान्य महिलेला त्रास दिला जात आहे. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे. जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असल्याचे आरोपही पेडणेकरांनी केला आहे.


ओबीसी मंत्रालयात मंत्री – सचिवांमध्ये खडाजंगी; पदभरतीचे कंत्राट निविदेविना