घरताज्या घडामोडीभाजपची सत्ता नाही तिथे तिथे त्रास दिला जातोय - महापौर किशोरी पेडणेकर

भाजपची सत्ता नाही तिथे तिथे त्रास दिला जातोय – महापौर किशोरी पेडणेकर

Subscribe

मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आज(शुक्रवार) आयकर विभागाने छापेमारी केली. तसेच त्यांच्या घरी आयकर विभागाकडून चौैकशी करण्यात येत आहे. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी भेट दिली. दरम्यान, भाजपची सत्ता नाही तिथे तिथे त्रास दिला जातोय, असं म्हणत महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर टीका केली आहे.

भाजपची सत्ता नाही तिथे तिथे त्रास दिला जातोय

किशोरी पेडणेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, तुम्ही ज्या पद्धतीने यंत्रणांचा वापर करत आहात. याकडे संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबईकरांचं लक्ष आहे. राज्यात ज्या ठिकाणी भाजपची सत्ता नाही. त्या ठिकाणी हा त्रास सर्वांना होतोय. हा त्रास फक्त महाराष्ट्र आणि मुंबईला होत नाहीये. तर झारखंड, पश्चिम बंगाल आणि पंजाब या राज्यांनाही होत आहे. परंतु हा त्रास आम्हाला होत असेल तर होऊ दे. कारण या त्रासाला आम्ही घाबरून घरात बसणार नाही. तर जे आहे ते आम्ही तुम्हाला दाखवू, अशा इशारा पेडणेकरांनी भाजपाला दिला.

- Advertisement -

आयकर अधिकाऱ्यांना यशवंत जाधव उत्तर देण्यास सक्षम

आयटीची धाड ही पहिल्यांदाच कोणावर पडतेय अशातला भाग नाहीये. आयटीच्या धाडीमध्ये आयटी फॉर्म भरताना काही कमी राहीलं असेल आणि हे सर्व संविधानाला माननारी प्राधिकरणं कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारी प्राधिकरणं आहेत. त्यामुळे त्यांना सहकार्य करण्याचं आणि माहिती देण्याचं काम यशवंत जाधव नक्की करतील. तसेच आयकर अधिकाऱ्यांना हवी ती माहिती आणि उत्तरं देण्यास जाधव सक्षम आहेत, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

भाजप नेते दुध के धुले

संविधानामध्ये काही कमी-जास्त असेल तर त्याचे परिणामही आम्ही अंगावर घ्यायला तयार आहोत. हे सर्व दुध के धुले आहेत आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एवढेच बरबटलेले आहेत हे त्यांचं म्हणणं आहे. आम्ही संविधान आणि कायदा मानतो. कायदा आणि संविधानाच्या चौकटीत राहून ही यंत्रणा आपलं काम करत आहे. आयकर अधिकाऱ्यांना यशवंत जाधव उत्तर देण्यास सक्षम आहेत, असं पेडणेकर म्हणाल्या.

- Advertisement -

किरीट सोमय्या जे ८ गाळ्यांबाबत उल्लेख करत आहेत. त्याबद्दल मला काहीही माहिती नाहीये. परंतु सोमय्या देत असतील तर मी घेण्यास तयार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि सत्ता गेल्यापासून त्यांच्या पक्षात काय चाललयं हे सर्व महाराष्ट्र आणि मुंबई बघतंय.

शिवसैनिकांकडून काहीही अयोग्य घडू नये, यासाठी मी येथे आली आहे. तसेच मी या विभागाची विभागप्रमुख आहे. शिवसैनिकांकडून कोणताही अनुचित प्रकार आणि प्रकरण वेगळ्या दिशेने जाऊ नये, यासाठी शिवसैनिकांना समजावण्यासाठी मी येथे आली आहे, असं पेडणेकर म्हणाल्या.

मुंबई, महाराष्ट्रातील वातावरण बिघडविण्याचा व शिवसेनेला डॅमेज करण्याचे त्यांचे षडयंत्र आहे, असे आरोप मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर केले आहेत. मात्र अशा कारवाईमुळे शिवसेना डॅमेज होणार नाही. आयटी च्या कारवाईला तोंड देण्यासाठी यशवंत जाधव समर्थ आहेत. मात्र सरकारी यंत्रणा ही दुधारी तलवार असून तिचा वापर तेथून व येथूनही करता येतो, असा सूचक इशाराही महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला दिला आहे.

यशवंत जाधव यांच्या घरावर सकाळीच इन्कम टॅक्स विभागाने धाड टाकल्याने भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या व भाजपच्या काही लोकांना असुरी आनंद झाला आहे. वास्तविक, इन्कम टॅक्स विभागाचे लोक यशवंत जाधव यांच्या घरी पाहणीला आले आहेत. मात्र भाजपवाले या धाडीचा मोठा गाजावाजा करीत आहेत, अशी टीकाही महापौरांनी यावेळी केली आहे.

कायद्याच्या चौकटीत संबंधित यंत्रणेने आपले काम करावे. मात्र शिवसैनिकांनी भावनेच्या भरात काही चुकीचे पाऊल उचलू नये, यासाठी मी त्यांना आवाहन करण्यासाठी येथे आले. तसेच, यशवंत जाधव यांच्या घरावर धाड पडल्यावर शिवसेनेचे नेते कुठे गायब झाले, त्यांची पळापळ झाली असे जे काही आरोप भाजप नेत्यांकडून केले जात आहेत, त्यांना उत्तर देण्यासाठी मी येथे आले आहे. आम्ही कुठे लपून बसलेलो नाही. तुमच्या असल्या भेकड कारवायांना घाबरत नाही. यशवंत जाधव हे भिमपुत्र आहेत. ते कोणालाही घाबरणारे नाहीत. ते तुम्हाला उत्तर द्यायला समर्थ व सक्षम आहेत, असा टोलाही महापौरांनी भाजपला लगावला.

भाजपाची महाराष्ट्रात, पश्चिम बंगाल आदी राज्यात जेथे सत्ता नाही तेथे ते ईडी, सीबीआय, आयटी आदी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप महापौरांनी यावेळी केला. वास्तविक, भाजपवाले विरोधकांना गुन्हेगार, भ्रष्टाचारी समजतात मात्र स्वतः काय दुधाने धुतलेले आहेत का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

भाजपचे किरीट सोमय्या यांनी २०२० लाही माझे नाव घेऊन काही आरोप केले होते. भ्रष्टाचाराच्या यादीत माझेही नाव घेतले असून मी ८ गाळे हडप केल्याचे आरोप केले आहेत. मात्र ‘ किरीट भावा’ त्या ८ गाळ्यांबाबत मला काहीच माहिती नाही. तुझ्याकडे ८ गाळे असतील तर मला दे, मी ते गाळे ताब्यात घ्यायला तयार आहे, असेही महापौरांनी म्हटके आहे.
भाजप, सरकारी यंत्रणा यांना आमच्यावर ज्या काही धाडी घालत आहेत, त्या घाला. मात्र पुढे तपासातून जे काही असेल ते स्पष्ट होईल, असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आम्ही कायदा मानतो, संविधान मानतो, त्यामुळे यशवंत जाधव चौकशीसाठी सहकार्य करतील. जे काही असेल ते समोर येईलच, असे महापौरांनी म्हटले आहे.

यंत्रणा दुधारी तलवार, तेथून व येथूनही वापरता येते

सरकारी यंत्रणा ही दुधारी तलवार असून तेथून व येथूनही वापरता येते, असा सूचक इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप नेत्यांना दिला आहे.

मंत्री छगन भुजबळांचे उदाहरण

राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनाही ईडीने अटक केली होती. तुरुंगात डांबले होते. मात्र त्यांना कायद्याने न्याय मिळाला व क्लिन चिट मिळालीच ना, असे उदाहरण महापौरांनी मिडियासमोर दिले.

शिवसेना डॅमेज होणार नाही

महाविकास आघाडी सरकार राज्यात चांगले काम करीत आहे मात्र भाजपला त्याची पोटदुखी होत आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर ईडी, आयटी यांचे धाडसत्र सुरू झाले असले तरी शिवसेनेला डॅमेज करू शकत नाही, असा आत्मविश्वास महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

असुरी आनंद अंगाशी येईल

भाजपवाले आता असुरी आनंद व्यक्त करीत असले तरी तो त्यांच्या अंगाशी येणार आहे, असा इशाराही महापौरांनी दिला आहे. तसेच, भाजपवाले गेली २० वर्षे आमच्या सोबत सत्तेत होते. पालिकेच्या सुधार समिती, शिक्षण समिती, बेस्ट समिती अध्यक्ष पदी भाजपचे नगरसेवक होते.


हेही वाचा : Yashwant Jadhav IT Raid : स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी ITची धाड, नेमकं काय आहे प्रकरण?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -