घरताज्या घडामोडीसाप म्हणून दोरी बडवण्याचा प्रकार सुरू, अडीच तासांच्या चौकशीनंतर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया

साप म्हणून दोरी बडवण्याचा प्रकार सुरू, अडीच तासांच्या चौकशीनंतर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया

Subscribe

एसआरए घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची आज दादर पोलिसांकडून सुमारे अडीच तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. साप म्हणून दोरी बडवण्याचा प्रकार सुरू असल्याची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.

पोलिसांचं बोलावणं आल्यानंतर मी तीन दिवस व्यस्त असल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु मी चौकशीला येणार असून कर नाही तर डर कशाला? ती म्हण मी कायम ठेवली. पोलिसांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिली, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

- Advertisement -

ज्या पद्धतीने हे रंगवलं जातंय त्यामधलं दहा टक्केही खरं नाही. साप म्हणून दोरी बडवण्याचा प्रकार सुरु आहे. मी कायद्याची लढाई लढत आहे. मी कोणत्याही आरोपांना उत्तर देणार नाही, असं पेडणेकर म्हणाल्या.

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. तसेच माझं निवेदन घेऊन जाणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मूळ शिवसैनिक म्हणून मी त्यांना भेटणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहे, असं पेडणेकर म्हणाल्या.

- Advertisement -

किशोरी पेडणेकरांवर आरोप कोणते?

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गोमाता जनता एसआरए प्रकल्पात कमी किंमतीमध्ये घरं विकण्याचा आरोप करण्यात आला आहे. पेडणेकरांनी काही गाळे आणि फ्लॅट्स कमी किमतीमध्ये विकत देण्याचे आश्वासन दिले होते. याच गोमाता जनता एसआरए इमारतीमध्ये सहाव्या माळ्यावरील घर स्वत:चे असल्याचे पेडणेकरांनी प्रतिज्ञापत्रात २०१७ मध्ये म्हटलं आहे.

तसेच दादर येथील एसआरए प्रकल्पात किशोरी पेडणेकर यांनी गैरव्यवहार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दादर एसआरए प्रकल्प घोटाळ्यात तीन आरोपी अटकेत आहेत. अटकेत असलेल्या महानगरपालिका वसाहत अधिकाऱ्याशी किशोरी पेडणेकर यांचे व्हॉटसअप चॅट समोर आल्यामुळे पेडणेकर यांचीसुद्धा चौकशी करण्यात येत आहे. दादर पोलिसांनी पेडणेकर यांची चौकशीसुद्धा केली होती. यानंतर त्यांना शनिवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु त्या हजर राहिल्या नाही. दादर एसआरए प्रकल्पात १ कोटी ३५ लाख रुपयांचा घोटाळा झाला असून हे पैसे ८ ते ९ जणांकडून घेण्यात आले आहेत.


हेही वाचा :  एसआरएप्रकरणी किशोरी पेडणेकरांची अडचण वाढणार?, सोमय्यांकडून पुन्हा इशारा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -