घरमहाराष्ट्रMutual Fund च्या 'या' योजनांमध्ये करा गुंतवणूक, एका वर्षात पैसे होतील डबल

Mutual Fund च्या ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक, एका वर्षात पैसे होतील डबल

Subscribe

तुम्हाला जर गुंतवणूक करायची आहे का? तुम्हाला कमी कालावधीत पैसे दुप्पट करायचे असतील तर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. आजकाल म्युच्युअल फंडात गुंतवणूक खूप वाढली आहे. हेच कारण आहे की गेल्या काही वर्षांपासून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूकीचे नियोजन वेगाने वाढत आहे. अनेक म्युच्युअल फंड योजनांद्वारे १ वर्षात दुप्पटीपेक्षा जास्त पैसे कमावले आहेत, तर अनेक योजनांमधून १ वर्षात पैसे जवळजवळ दुप्पट झाले आहेत. जर तुम्हालाही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची असेल तर या योजना तुमच्या उपयोगात येऊ शकतात. चला त्याबद्दल सर्व काही जाणून घेऊ

एसआयपीमध्ये गुंतवणूक करा

- Advertisement -

एसआयपी म्हणजे सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट योजना ही एक प्रकारची गुंतवणूक पद्धत आहे. आपण एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. हे बर्‍यापैकी सुरक्षित आणि विश्वासार्ह मानले जाते. कारण एसआयपीमार्फत गुंतवणूक दरमहा एका निश्चित तारखेला म्युच्युअल फंड योजनेत केली जाते. हे जवळजवळ त्याच प्रकारे आहे जेव्हा आरडी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये केली जाते. दरमहा थोडी गुंतवणूक नंतर मोठी रक्कम होते.

कोटक स्मॉल कॅप म्युच्युअल फंड

- Advertisement -

या योजनेत एका वर्षात १३१.३५ टक्के परतावा देण्यात आला आहे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने १ वर्षापूर्वी कोटक स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनेत एक लाख रुपये गुंतविले असेल तर त्याचे मूल्य २,३१,३५५ रुपये झाले आहे. दुसरीकडे जर एखाद्या गुंतवणूकदाराने एसआयपीमार्फत कोटक स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक केली असती तर त्याला १२३.११ टक्के परतावा मिळाला असता. एसआयपीमार्फत दरमहा १०,००० रु.ची गुंतवणूक यावेळी १,८९,६१० रुपये झाली असती.

निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना

या योजनेत एका वर्षात ११५.४१ टक्के परतावा मिळाला आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने १ वर्षापूर्वी निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनेत १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे मूल्य २,१५,४०६ रुपये झाले आहे. दुसरीकडे जर एखाद्या गुंतवणूकदाराने एसआयपीमार्फत निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक केली असती तर त्याला १११.२९ टक्के परतावा मिळाला असता. एसआयपीमार्फत दरमहा १०,००० रु.ची गुंतवणूक यावेळी १,८३,५०८ रुपये झाली असती.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -