Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रNew Government : सत्तास्थापनेस का होतोय उशीर? जाणून घ्या कारणं...

New Government : सत्तास्थापनेस का होतोय उशीर? जाणून घ्या कारणं…

Subscribe

महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार? अशी चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. तर दुसरीकडे विधानसभेच्या निकालाला आठवडा होऊन गेला तरीही राज्याचा नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील खातेवाटपासंदर्भात महायुतीच्या चर्चा आणि बैठकांचे सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई : महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार? अशी चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. तर दुसरीकडे विधानसभेच्या निकालाला आठवडा होऊन गेला तरीही राज्याचा नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील खातेवाटपासंदर्भात महायुतीच्या चर्चा आणि बैठकांचे सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात नव्या सरकारचा शपथविधी होण्यास उशीर का होत आहे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. (Know the reasons behind the delay in government formation in Maharashtra)

महायुतीला प्रचंड बहुमत मिळून देखील मुख्यमंत्री आणि खातेवाटपावरून नाराजी नाट्य सुरू असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. शिवसेनेने गृह खात्यावर दावा केला आहे, मात्र अद्याप भाजपाकडून या दाव्यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपालाच मुख्यमंत्रिपद मिळेल आणि मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

अमित शहांसोबत गुरुवारी (28 नोव्हेंबर) रात्री उशीरा झालेल्या बैठकीत फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन तसे संकेत दिले होते. त्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या खातेवाटपासंदर्भात मुंबईत महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी गेल्याने महायुतीची आजची बैठक रद्द करण्यात आल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. तसेच पुढील दोन दिवसात महायुतीकडून सत्तास्थापनेबाबत कोणतीही चर्चा होण्याची शक्यता नाही. कारण शनिवार आणि रविवारी अमावस्या आहे. या दोन दिवशी शुभकार्य केलं जात नाही. त्यामुळे या काळात बैठका होण्याची शक्यता कमीच आहे. यानंतर महायुतीची बैठक होईल आणि त्यानंतर पुढील काही दिवसांत नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Bjp News : भाजपच्या बड्या नेत्याचाही ‘ईव्हीएम’वर भरोसा नाही का? पडताळणीसाठी दाखल केला अर्ज

- Advertisement -

महायुतीतील घटक पक्षांना किती मंत्रिपद हवी?

एकीकडे मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत वाद होताना दिसत आहे, तर दुसरीकडे मंत्रिमंडळातील जागावाटप आणि खातेवाटपावरून तिढा निर्माण झालेला आहे. भाजपाला मुख्यमंत्रिपदासह किमान 20 मंत्रिपदं हवी आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 10 ते 12 मंत्रिपदं हवी आहेत. याशिवाय अजित पवार गटालाही 8 ते 10 मंत्रिपदं हवी आहेत. त्याबरोबरच वित्तमंत्रालयावर पुन्हा एकदा अजित पवार गटाचा डोळा असल्याचे समजते.

भाजपाने अद्याप विधानसभेसाठी नेत्याचीही निवड नाही

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झाल्याची चर्चा आहे. मात्र निवडणुकीला आठवडा होत आला तरी अद्याप भाजपाकडून विधानसभा सदस्य दलाच्या नेत्याची निवड झालेली दिसत नाही. तसेच विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आणि पक्षाच्या निरीक्षकांबाबतही अद्याप काही घोषणा झालेली नाही. प्रविण दरेकर यांनी मागील वेळेस विधान परिषदेवर गटनेते पद भूषविले होते. मात्र आता त्यांना पुन्हा एकदा गटनेते नको असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – Eknath Shinde : महायुतीची आजची बैठक रद्द; मुख्यमंत्रिपदाची घोषणा लांबणीवर


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -