घरमहाराष्ट्रजाणून घ्या घटस्थापनेचा शुभमुहूर्त!

जाणून घ्या घटस्थापनेचा शुभमुहूर्त!

Subscribe

पण घटस्थापने दिवशी कोणत्या वेळेत घट बसवायचे? चांगला मुहूर्त कोणता? असे प्रश्न अनेकांना पडतात. म्हणूनच ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. 

गणेशोत्सवानंतर आता वेध लागले आहेत नवरात्रोत्सवाचे. २९ सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. या दिवसांमध्ये देवीची आराधना करण्यापासून दांडीया, गरबा खेळण्याची परंपरा आहे. पण घटस्थापने दिवशी कोणत्या वेळेत घट बसवायचे? चांगला मुहूर्त कोणता? असे प्रश्न अनेकांना पडतात. म्हणूनच ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

हा आहे मुहूर्त

यंदाच्या वर्षी घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त सकाळी ८ ते दुपारी १२.३० वाजता पर्यंतचा आहे. तसेच, दुपारी २ ते ३.३० वाजताच्या सुमारास गुरू ग्रहाचा प्रभाव राहणार असल्यामुळे, या काळातही घटस्थापना केली जाऊ शकते, असे ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले आहे. या सर्वोत्तम मुहूर्ताच्या काळात वातावरणामध्ये शुक्र-बुध-चंद्र या ग्रहांचा मोठ्या प्रमाणात शुभप्रभाव असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ताई काळजी घ्या.. डेंग्यू झालेल्या सुप्रिया सुळेंना कार्यकर्त्यांचे आर्जव

अन्य विधींचा मुहूर्त

बुधवारी २ ऑक्टोबर रोजी उपांग ललिता पंचमी करावी. यावर्षी मातामह श्राद्ध २९ सप्टेंबर रोजी दुपारच्या वेळी करावे. शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी घागरी फुंकण्याचा विधी तर रविवारी ६ ऑक्टोबर रोजी महाअष्टमी व महानवमीचा उपवास करावा, अशी माहितीसुद्धा डॉ. वैद्य यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -