पुणे : गेल्या काही वर्षापासून दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणुकीला खूप उशीर होत आहे. गेल्या वर्षी दगडूशेठ गणपती विसर्जनाला सकाळी 7.45 वाजता बेलबाग चौकात बाप्पाचे आगमन झाले होते. यावेळी भाविक हे बाप्पाच्या दर्शनातासाठी ताटकळत उभे राहिले होते. यामुळे यंदा दगडूशेठ गणपती बाप्पाचे विसर्जन मिरवणूक दुपारी 4 वाजता लक्ष्मी रस्त्याने सहभागी होणार आहे.
राज्यभरात गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू झाली असून प्रत्येक गणेश मंडळ गणपती मंडळाच्या सजावतीला देखील सुरुवात झाली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात गणेश मंडळात कोणती सजावट करावी, असे विचार गणेश मंडळ करत आहेत. पुण्यातील पाच मानाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन पाहण्यासाठी जगभरातील लोक पुण्यात येतात. पुण्यात ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक निघते. गेल्या काही वर्षापासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणुकीला उशीर होत आहे. पण यंदाची बाप्पाची मरवणूक ही दुपारी 4 वाजताच्या सुमारास लक्ष्मी रस्त्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारणार
यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्ण युग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्ट हे 131 व्या वर्षात पदार्पण करत असून यामुळे अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी अयोध्येत श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर दगडूशेठ गणपतीच्या श्रीराम मंदिरांची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.
हेही वाचा – अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पुढच्या वर्षी जानेवारीत होणार
पुढच्या वर्षी होणार प्रभू श्रीरामाच्या मूर्तींची प्रतिष्ठापणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तींची प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापणा 21, 22 आणि 23 जानेवारी तीन तारखा ठरवण्यात आल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीसांनी दिली आहे. अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठपणेचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी विविध पक्षातील नेत्यांना अशा एकूण 25000 संताना आमंत्रित आहे. या सोहळ्यात उपस्थितीत राहणाऱ्याची तयार करण्यात आली असून यावर लवकरच श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या स्वाक्षरी असलेल्या निमंत्रण पत्रिका पाठवण्यात येतील. या सोहळ्यानंतर अयोध्येत महिनाभर भाविकांना मोफत भोजन देण्यात येणार असल्याचे राय यांनी सांगितले.