घरताज्या घडामोडीकोल्हापूर - कर्नाटक बससेवा रद्द

कोल्हापूर – कर्नाटक बससेवा रद्द

Subscribe

जोपर्यंत हा तणाव निवळत नाही तोपर्यंत या दोन्ही शहरातील बस बंद ठेवण्यात येणार आहेत

सीमाप्रश्न वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कोल्हापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या आणि कर्नाटकातून कोल्हापुरात येणाऱ्या सगळ्या बससेवा रद्द करण्यात आल्या आहेत. कर्नाटक नवनिर्माण सेनेचे भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्याविरोधात वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर कोल्हापूर आणि कर्नाटक या दोन्ही शहरात तणाव निर्माण होऊन आंदोलन करण्यास सुरुवात झाली.

या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेकडून प्रति आव्हान करण्यात आलं की, आम्ही कर्नाटकात येतो आम्हाला किती जणांना गोळ्या घालायच्या आहेत त्या घाला. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या आणि कर्नाटकातून कोल्हापुरात येणाऱ्या सर्व बस बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय बेळगावात काल दुकानांवरील मराठी पाट्या देखील फोडण्यात आल्या. तसंच आता जोपर्यंत हा तणाव निवळत नाही तोपर्यंत या दोन्ही शहरातील बस बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर आणि कर्नाटक प्रवाशांना या अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कर्जमाफीवर शेतकरी नाराज!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -