घरताज्या घडामोडीकोल्हापूर : महापालिकेत चक्क विरोधी नगरसेवकांने घेतले गटनेत्याचे चुंबन

कोल्हापूर : महापालिकेत चक्क विरोधी नगरसेवकांने घेतले गटनेत्याचे चुंबन

Subscribe

कोल्हापूर महापालिकेत भाजपा नगरसेवकाने काँग्रेस नगरसेवकाचे घेतले चक्क चुंबन.

बऱ्याचदा अनेक महापालिकांमध्ये सर्वसाधारण सभा या हाणामारी आणि बाचाचीने गाजल्याचे समोर आले आहे. मात्र, कोल्हापूरची आज सभा एका वेगळ्याच गोष्टींनी गाजल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर महापालिकेत एका नगरसेवकाने चक्क दुसऱ्या नगरसेवकाचे करकचून गालाचे चुंबन घेतले आहे. महापालिकेची सभा सुरु असताना भर सभागृहात विरोधीगटाच्या नगरसेवकाने सत्ताधारी काँग्रेसच्या गटनेत्याची चुंबन घेतल्याने सर्वजण आवाक झाले आणि एकच हशा पिकला.

नेमके काय घडले?

कोल्हापुरच्या महापालिकेत आज सभा घेण्यात आली होती. दरम्यान, विरोधी गट असलेल्या ताराराणी आघाडीचे नगरसेवक कमलाकर भोपळे सत्ताधारी गटाच्या बाकावर जाऊन बसले होते. तर त्यांच्या शेजारी काँग्रेसचे गटनेते आणि स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख बसले होते. त्यानंतर सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली. त्यादरम्यान, अभिनंदनाचे ठराव सुरु असतानाच भोपळे आणि देशमुख यांच्यात काहीतरी बोलणे झाले. त्यानंतर खुशीत असलेल्या कमलाकर भोपळे यांनी भरसभागृहात शारंगधर देशमुख यांच्या गालाची चक्क चुंबन घेतली. अचानक झालेल्या याप्रकारामुळे सर्व सभागृहात एकच हशा पिकला. मात्र, या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, या प्रकारामुळे महिलांनी अक्षरश: तोंडावर हात ठेऊन हसल्या.

- Advertisement -

हेही वाचा – बारामतीच्या जवळ असलेल्या नेत्यांची इंदिरा गांधीवर टीका – आशिष शेलार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -