घरताज्या घडामोडीकोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन

कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन

Subscribe

कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं आज, गुरुवारी पहाटे निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून आजारपणामुळे चंद्रकांत जाधव यांच्यावर हैदराबाद मधील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी १च्या सुमारास त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणले जाणार आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांच चंद्रकांत जाधव आमदार म्हणून निवडून आले होते. पहिल्यांदाच निवडणूक लढवून त्यांनी हे यश प्राप्त केले होते. अल्पावधीतच सर्वांचे लाडके आणि आवडते आमदार म्हणून त्यांची ओळख झाली होती. शिवाय व्यापार आणि उद्योग, तसेच फुटबॉलशी जोडले गेलेले आमदार म्हणून त्यांना ओळखले जात होते. त्यामुळे लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत त्यांचा संपर्क होता. सर्व पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. कोरोनाच्या काळात मागील दीड वर्षात चंद्रकांत जाधव यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर पूर्णपणे मात केली होती. पण काही दिवसांपासून त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला.

- Advertisement -

माहितीनुसार ८ दिवसांपूर्वी हैदराबादमधील रुग्णालयात उपचारासाठी चंद्रकांत जाधव यांना दाखल केले होते. त्यांना पोटामध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी त्यांच्यावर मोठी शस्रक्रिया झाली होती. ही शस्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली, मात्र त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. उपचारदरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


हेही वाचा – Uday samant car accident: मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात; एक बॉडीगार्ड जखमी

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -