घरताज्या घडामोडीआता घरातही मास्क वापरणे बंधनकार, अन्यथा होणार दंड!

आता घरातही मास्क वापरणे बंधनकार, अन्यथा होणार दंड!

Subscribe

आता घरातही मास्क लावण्याचे बंधनकारक केले असून मास्क न लावल्यास दंड भरावा लागणार आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना खबरदारीचा उपाय म्हणून आता घरातही मास्क वापरण्याच्या महापालिकेकडून सूचना देण्यात आल्या आहेत. एकाच घरात अनेकांना कोरोनाची बाधा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोल्हापुरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. दिवसाला जवळ जवळ शंभर रुग्ण आढळत असल्याने आणि शहरातील काही भाग हॉटस्पॉट झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वाढणाऱ्या संख्येमुळे आता रुग्णालय देखील कमी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरातही मास्क वापरण्याच्या सूचना महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले आहेत.

- Advertisement -

एकाच घरात ४ ते ५ जण पॉझिटिव्ह

एकाच घरात चार ते पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना गेल्या दोन दिवसात निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे घरात होणारा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आता मास्क वापरणे बंधनकार केले आहे. विशेष म्हणजे मास्क न वापरल्यास शंभर रुपये दंड केला जात आहे.

या परिसरात अधिक कोरोनाचा संसर्ग

कोल्हापूरच्या टिंबर मार्केट, जवाहरनगर, ताराबाई पार्क या भागात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढ आहे. मंगळवारी दिवसभरात शहरात ११० करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंतचा शहरातील आकडा १ हजार १२४ पर्यंत पोहोचला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत १४२ लोकांचा बळी गेला असून पाच हजारावर लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातही अनेक उपाय योजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये घरातही मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – देवळाली कॅम्प परिसरात बिबट्या जेरबंद 


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -