भटक्या कुत्र्यांसाठी नेपाळी टेक्निकचा वापर

. मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्यासाठी कुत्र्यांना पकडण्याचे काम करण्यासाठी मानव खेत्री आणि संदीप थुई हे दोन नेपाळी तरूण कोल्हापूरमध्ये काम करीत आहेत.

stray-dogs
kolhapur nepali technique catching dogs

सध्या शहरात भटक्‍या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांना मारण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, रस्त्यावर भटकणारी कुत्री नागरिकांसाठी धोकादायक बनत आहेत. मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्यासाठी कुत्र्यांना पकडण्याचे काम करण्यासाठी मानव खेत्री आणि संदीप थुई हे दोन नेपाळी तरूण कोल्हापूरमध्ये काम करीत आहेत.

नेमकी काय आहे टेकनीक?

ज्या ज्या भागात मोकाट कुत्री आहेत,त्या भागात जाऊन मानव खेत्री तेथील कुत्र्यांना एका विशिष्ठ इशाऱ्याद्वारे जवळ बोलावतात. त्यानंतर अवघ्या काही क्षणात ते कुत्र्यांचे मागील पाय पकडतात आणि त्याला हवेत गोल फिरवतात. तेव्हा कुत्र्याला ग्लानी येते. त्याचवेळी संदीप थुई त्या कुत्र्यावर जाळी टाकतात. असेच जाळीत घातलेल्या सर्व कुत्र्यांना गाडीतून आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये आणले जाते. दिवसाला १० ते १५ कुत्री पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली जाते. त्यानंतर कुत्र्यांना खाद्य देऊन त्यांची प्रकृती सुधारली जाते. त्यानंतर पुन्हा त्यांना सुरक्षितपणे जिथून आणले तिथे सोडले जाते. काही भटकी कुत्री आजारी, जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडून असतात. त्यातून संसर्गजन्य आजार यांना होऊ शकतो, असा कुत्र्यांवर योग्य उपचार आणि शस्त्रक्रिया करून त्यांना सुरक्षित करण्याचे काम ट्रस्ट आणि महापालिकतर्फे केले जाते.

विविध शहरांत डॉग कॅचिंग

डॉग कॅचर मानव खेत्री आणि संदिप थुई यांनी यापूर्वी गुजरात, केरळ, दिल्ली या राज्यांतील अनेक शहरांतील मोठ्या सहकाऱ्यांसोबत डॉग कॅचिंगचे काम केले आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूरला ते आले. अनेकदा कुत्र्यांना कोणी दगड मारते, त्यांना सतत हुसकावले जाते, व्यसस्थीत खायला मिळत नाही, बऱ्याचदा दुषित पाणी प्यावे लागते. त्यावेळी कुत्री आक्रमक होतात, चावतात. असे मानव खेत्री यांनी सांगीतले. तसेच आमच्या स्वत:च्या सुरक्षेसाठी आम्ही वैद्यकीय तज्ञांकडून तपासणी आणि उपचारही घेतो.