घरमहाराष्ट्रकोल्हापुरात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज, इंटरनेट सेवाही बंद

कोल्हापुरात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज, इंटरनेट सेवाही बंद

Subscribe

मंगळवारी (ता. 06 जून) शिवराज्याभिषेकाच्या दिवशी कोल्हापुरातील 7-8 तरूणांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे फोटो पोस्ट केले. या प्रकरणी कोल्हापुरात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

मंगळवारी (ता. 06 जून) शिवराज्याभिषेकाच्या दिवशी कोल्हापुरातील 7-8 तरूणांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे फोटो पोस्ट केले. ही बाब शहरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची पोलीस ठाण्यात तक्रार केली. पण हे प्रकार शहरात किंवा राज्यात पुन्हा होऊ नये, यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनकडून एकत्र येत मोर्चा काढण्यात आला. पण या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीहल्ला केला. सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दंगलीच्या घटना घडणे हे त्यांचे अपयश, संजय राऊता आरोप

- Advertisement -

आज (ता. 07 जून) सकाळी 9 वाजताच्या सुमारास कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी जमून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. मात्र, यावेळी जमलेल्या संघटना रॅली काढण्यावर ठाम होत्या. पोलिसांनी मात्र या रॅलीला परवानगी दिली नाही. यानंतर पोलीस आणि संघटनांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली.

त्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे शिवाजी चौक परिसराला लागून असलेल्या भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी रस्त्यावर चपलांचा ढीग पडला होता.

- Advertisement -

दरम्यान, पुन्हा एकदा दुपारी साडेबाराच्या सुमारास मनपा शिवाजी चौक भागातील बहुंताश भाग चिंचोळ्या रस्त्यांचा आहे. त्यामुळे या भागात दबा धरुन बसलेला जमाव पुन्हा रस्त्यावर आला. त्यामुळे पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. यानंतर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत जमावाला लाठीचार्ज करत पांगवले. शहरातील पान लाईन, महाद्वार रोड, माळकर तिकटी, बारा इमाम परिसर, शिवाजी रोड, अकबर मोहल्ला परिसरात जमावाकडून तोडफोड करण्याचा प्रयत्न देखील यावेळी करण्यात आला. परंतु पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत जमावाला पांगवतानाच प्रत्येक चौकात फौजफाटा तैनात केल्याने अनुचित प्रकार टाळता आला आहे. तर इतर काही अनुचित घटना घडू नये, यासाठी शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

कोल्हापूरात काल (ता. 06 जून) काही तरूणांनी आपल्या व्हॉट्सअपला औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे फोटो स्टेट्सला ठेवले होते. ज्यानंतर ही बाब काही हिंदुत्ववादी संघटनांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात करत या तरुणांवर कारवाई करण्याची विनंती केली. त्यानंतर या संघटनांनी दुपारी 04 वाजेपर्यंत वाट पाहिली, पण या प्रकरणी कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने हिंदुत्ववादी संघटनेच्या तरूणांनी पोलीस स्टेशनच्या समोरच ठिय्या आंदोलन करण्यास सुरूवात केली.

त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तीन ते चार तरूणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. हे सर्व तरूण अल्पवयीन असल्याचे उघड झाले. ज्यानंतर कोल्हापुरातील वातावरण शांत झाले. पण या प्रकरणावरून पुन्हा एकदा रात्री हिंदुत्ववादी संघटनांमध्ये बैठक झाली. ज्यामध्ये महाराष्ट्रात या घटना पुन्हा घडू नये, यासाठी निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यानंतर आज सकाळी (ता. 07 जून) 9.30 वाजल्यापासून कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत आंदोलन करण्यास सुरूवात केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -