घरमहाराष्ट्रकोल्हापुरात हल्लेखोरांनी आयपीएसवर रोखले पिस्तूल

कोल्हापुरात हल्लेखोरांनी आयपीएसवर रोखले पिस्तूल

Subscribe

मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या आयपीएसवर हल्लेखोरांनी पिस्तूल रोखल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या आयपीएसवर पिस्तूल रोखल्याची खळबळजनक घटना कोल्हापुरात घडल्याचे समोर आले आहे. कोल्हापुरातील यादवनगर परिसरातील माजी महापौरांच्या पतीच्या मटका अड्ड्यावर हा छापा टाकण्यासाठी गेलेल्या परिक्षाविधीन सहायक पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका शमा मुल्ला यांच्यासह १३ संशयितांना ताब्यात घेतले असून रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

नेमके काय घडले?

कोल्हापुरातील यादवनगर परिसरातील माजी महापौरांच्या पती मटका अड्डा चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या मिळालेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस अधिक्षक शर्मा सोमवारी रात्री आठच्या सुमारास सहा पोलीस कर्मचाऱ्यांसह पांजरपोळ येथील मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेल्या होत्या. मटका अड्ड्यावर छापा टाकून त्यांनी चार संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या तरुणांनी चौकशीत हा अड्डा माजी महापौर शमा मुल्ला यांचे पती सलीम मुल्ला याचा असल्याचे सांगितले. त्यावेळी शर्मा या दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह जवळच असलेल्या मुल्ला यांच्या घरी गेल्या. त्यांनी मुल्ला यांच्याकडे चौकशी केली असता, चौकशी दरम्यान त्या ठिकाणी असलेल्या हल्लेखोरांनी हल्ला चढवत शर्मा यांच्या रक्षक कर्मचाऱ्याकडील पिस्तूल हिसकावून घेऊन ते शर्मा यांच्यावर रोखली आणि त्या ठिकाणावरुन पळ काढला. या प्रकाराची वरिष्ठांना माहिती समजल्यानंतर घटनास्थळी पोलीस फौजफाटा दाखल झाला. याप्रकरणी माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्यासह १३ जणांना ताब्यात घेतले असून सलीम मुल्ला हल्लेखोर पिस्तूलासह पसार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -