घरमहाराष्ट्रनव्या समीकरणामुळे कोल्हापूरचे राजकारण बदलणार?, खासदार मंडलिक शिंदे गटात

नव्या समीकरणामुळे कोल्हापूरचे राजकारण बदलणार?, खासदार मंडलिक शिंदे गटात

Subscribe

आमचं ठरलंय’ हा पॅटर्न 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हिट झाला होता. यावेळी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांना मदत केली होती. या मदतीच्या जोरावर संजय मंडलिकांनी शिवसेनेच्या तिकीटावर कोल्हापूर लोकसभेची निवडणूक जिंकली होती. मात्र, आता शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे कोल्हापूर जिल्ह्याचे राजकाराण 360 अंशात फिरल्याचा दावा करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पुढच्या राजकारणात नवीन समीकरणे दिसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आमचं ठरलंय पॅटर्न –

- Advertisement -

अडीच वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मंडलिक शिवसेना व भाजपा युतीचे तर महाडिक राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे उमेदवार होते. मात्र, ‘आमचं ठरलंय’ असे म्हणत आमदार सतेज पाटील यांनी उघडपणे शिवसेनेचा प्रचार केला. मुश्रीफ प्रचारात फारसे सक्रिय झाले नाहीत. त्यामुळे एकप्रकारे मंडलिकांना मदत झाली. यामुळे महाडिक यांना मोठा पराभव पत्करावा लागला. मात्र, आता जिल्ह्याचे राजकारण अचानक बदलले असून खासदार मंडलिक बंडखोर शिंदे गटात सामील झाले आहेत.

मुश्रीफांना उमेदवारी मिळण्याची शक्यता –

- Advertisement -

मंडलिक शिंदे गटात गेल्याने दीड वर्षानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ते भाजपचे उमेदवार असतील हे निश्चित आहे. महाडिक राज्यसभेचे खासदार झाल्याने भाजपला ताकदीचा उमेदवार हवाच होता. तो भाजपला मंडलिक यांच्या रुपाने मिळाला आहे. मात्र, मंडलिकांना शह देण्यासाठी दोन्ही काँग्रेसकडून तगडा उमेदवार देण्यात येणार आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने संभाजीराजे, के.पी. पाटील, ए.वाय. पाटील, अशी नावे चर्चेत  येतील. मात्र,मुश्रीफां यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

धनंजय महाडिक करणार मंडलिकांचा प्रचार –

धनंजय महाडिक यांना मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या मदतीने मंडलिकांनी पराभूत केले. ते महाडिक नव्या समीकरणात भाजपचा प्रचार करतील. मंडलिकांच्या प्रचारात महाडिक यांच्यासह आमदार प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, कदाचित चंद्रदीप नरके, समरजित घाटगे, आमदार राजेश पाटील उतरतील. तर मंडलिकांच्या पराभवासाठी सतेज पाटील, पी.एन. पाटील, के.पी. पाटील, ए.वाय. पाटील असे नेते मुश्रीफांच्या प्रचारात उतरतील. यामुळे लोकसभा निवडणूकीचा सामना चांगलाच रंगण्याची चिन्हे आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात मुश्रीफ आणि पाटील यांच्या विरोधात भाजपची नवी टिम –

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफ आणि पाटील यांच्या विरोधात भाजपची नवी टिम उभी राहणार आहे. ज्यामध्ये महाडिक, मंडलिक यांच्यासह आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे, आबिटकर, नरके, क्षीरसागर, समरजित घाटगे, कुपेकर अशा नेत्यांच्या नव्या गटाचा समावेश असणार आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -