Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र कोल्हापुरात 350 जणांवर गुन्हे दाखल, बंदची हाक देणाऱ्या संघटना राहिल्या बाजूला

कोल्हापुरात 350 जणांवर गुन्हे दाखल, बंदची हाक देणाऱ्या संघटना राहिल्या बाजूला

Subscribe

कोल्हापूर राड्याच्या प्रकरणी 350 पेक्षा अधिक जणांवर गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या हिंदुत्ववादी संघटनांनी या बंदची हाक दिली होती. त्यापैकी एकाही संघटनेचे नाव FIRमध्ये नसल्याची माहिती समोर आलेली आहे.

बुधवारी (ता. 07 जून) सकाळी कोल्हापुरात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार शहरातील दुकानेही बंद ठेवण्यात आली. पण त्यानंतर 10.30-11 वाजताच्या सुमारास अचानक शहरातील काही भागांत तणाव निर्माण झाला. यानंतर पोलिसांकडून जमावावर लाठीचार्ज आणि अश्रुधूराच्या नळकांड्या फोडण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी 36 जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती कोल्हापुरचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्याकडून देण्यात आलेली होती. पण आता या राड्याच्या प्रकरणी 350 पेक्षा अधिक जणांवर गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या हिंदुत्ववादी संघटनांनी या बंदची हाक दिली होती. त्यापैकी एकाही संघटनेचे नाव यामध्ये नसल्याची माहिती समोर आलेली आहे.

हेही वाचा – एकीकडे दंगल तर दुसरीकडे दरोडा, कोल्हापुरातील घटनेने सराफा व्यायसायिकांमध्ये घबराट

- Advertisement -

कोल्हापुरात राडा झाल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी 36 जणांना अटक केली. त्यानंतर या 36 जणांपैकी तीन अल्पवयीन मुलांची रवानगी बाल सुधारगृहात पाठवण्यात आले. तर उर्वरित 33 जणांना गुरुवारी (ता. 08 जून) न्यायालयात हजर करण्यात आले. या सर्वांना न्यायालयाकडून कोठडी सुनावण्यात आली आहे.

औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचा फोटो व्हॉट्सअप स्टेट्सला ठेवण्यात आल्यानंतर ही बाब काही हिंदुत्ववादी संघटनांच्या लक्षात आली. त्यानंतर संघटनांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन कारवाईची मागणी केली. पण दुपारपर्यंत या प्रकरणी कारवाई न झाल्याने या संघटनांकडून पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी या संघटनांची समजूत काढून त्यांना पुन्हा पाठवले. पण काही संघटनांनी रात्रीच्या वेळी मिटींग घेऊन कोल्हापूर बंद ठेवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संघटनांनी जमून आंदोलन करण्यास सुरूवात केली. ज्यानंतर शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.

- Advertisement -

पण हे प्रकरण पोलिसांशी चर्चा करून वेगळ्या मार्गाने सोडवता आले असते. परंतु तसे न करता बंदची हाक देण्यात आली. ज्यानंतर काही विकृतांकडून शहरात अशांतता पसरवली गेली. ज्या 36 जणांना पोलिसांनी अटक केली आहे, त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 143, कलम 427 (नुकसान घडवून आणणे), कलम 353 (सरकारी कर्मचाऱ्याला त्याचे कर्तव्य बजावण्यात अडथळा आणणे), कलम 188 (आदेशांचे उल्लंघन), कलम 109 (गुन्ह्यास उत्तेजन देणे) आणि मुंबई पोलिस कायद्यातील कलम 37 (1) 3 प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करण्यासंबंधी कलम लावण्यात आलेली आहेत. तर पोलिसांनी FIRमध्ये 350 हून अधिक अज्ञात लोकांना देखील हीच कलमं लावण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -