दोन महिन्यानंतर केंद्रीय पथक पाहणीसाठी कोल्हापुरात, शेतकऱ्यांकडून जोरदार निषेध

बुके देऊन शेतकरी अधिकाऱ्यांच्या दौऱ्याचा निषेध करणार होते परंतु पोलिसांनी त्यांना आडवले

kolhapur sangli flood swabhimani sanghatana protest on central team in inspection of crop
दोन महिन्यानंतर केंद्रीय पथक पाहणीसाठी कोल्हापुरात, शेतकऱ्यांकडून जोरदार निषेध

केंद्रीय पथक पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आजपासून कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र, कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान दोन महिन्यांपुर्वी झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानीची पाहणी करणार आहेत. तब्बल अडीच महिन्यानंतर केंद्रीय पथक पाहणी दौऱ्यावर आल्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय पथक कोल्हापुरात दाखल झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात गेले होते. यावेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांचे स्वागत करत निषेध केलाय तर दोन महिन्यांनंतर पाहणी करण्यास आल्यामुळे प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी काही संतप्त शेतकऱ्यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली आहे.

केंद्रीय पथक जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रीय पथक तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर पाहणी करण्यासाठी आल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. स्वभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्याचा निषेध केला आहे. अधिकारी बांधावर आल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांशी झटपट केली यामुळे वातावरण चांगलेच तापलं होते.

स्वागत करण्यापासून शेतकऱ्यांना अडवलं

केंद्रीय पथक नुकसानीचा पाहणी दौरा करण्यासाठी आल्यावर त्यांचे स्वागत करण्यापासून पोलिसांनी शेतकरी आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना आडवण्यात आलं आहे. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी फुलांचा बुके आणला होता. हा बुके देऊन शेतकरी अधिकाऱ्यांच्या दौऱ्याचा निषेध करणार होते परंतु तसं करण्यापासून पोलिसांनी त्यांना आडवले यामुळेच शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली.

केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा

केंद्रीय पथकाचा दौरा खेड, चिपळूणमधील पुरग्रस्त भागाची पाहणी, सांगलीमध्ये दुपारी केंद्रीय पथक दाखल होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात येणार आहे. तसेच मिरज तालुका आणि इतर भागातील नुकसानीचा आढावा घेण्यात येणार आहे. परंतु केंद्रीय पथकाच्या दौऱ्यावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दोन ते अडीच महिन्यानंतर पथक येणार आहे तर पाहणी काय करणार असे अनेक प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.


हेही वाचा : दोन महिन्यानंतर केंद्रीय पथक पश्चिम महाराष्ट्रासह कोकणच्या दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी