शिवसेना खासदार संजय मंडलिकांना कोरोनाची लागण

sanjay mandlik
शिवसेना खासदार संजय मंडलिक

कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींभोवती कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. कोल्हापुरातील तीन आमदारांना कोरोनाची बाधा झाल्याची घटना ताजी असताना शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर संजय मंडलिक यांच्या कुटुंबातील अजून दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे.

शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्यासह दोघांना कोरोनाची लागण झाली असून सध्या संजय मंडलिक यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

यांनाही झाली कोरोनाची लागण

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर २१ ऑगस्ट, शुक्रवारी ऋतुराज पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर रविवारी, २३ ऑगस्ट रोजी कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांना कोरोनाची लागण झाली होती. सध्या या दोघांवरही जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्यानंतर आता खासदार संजय मंडलिक यांनाही कोरोना झाला आहे. तर माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा विळखा लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यत पोहचल्याने चिंता वाढली आहे.


हेही वाच – ऑक्सफर्ड लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीला आजपासून सुरुवात