CCTV: गुऱ्हाळ घरातील काहीलीत तरुणाने मारली उडी

पोलिसांकडून या घटनेचा तपास सरु आहे. दरम्यान, आर्थिक विवंचना किंवा कौटुंबिक वादातून गौतमने आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

Kolhapur Youth commits suicide
कोल्हापूरमध्ये तरुणाची आत्महत्या

कोल्हापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने गुऱ्हाळ घरातील काहीलीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवा येथे ही घटना घडली आहे. गौतम कांबळे असं या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमध्ये गौतम ९५ टक्के भाजला आहे. त्याच्यावर सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

अशी घडली घटना

आज दुपारी गुऱ्हाळ घरामध्ये गुळ बनवण्याचे काम सुरु होते. गौतम कांबळे हा देखील या गुऱ्हाळ घरामधील कामगार होता. तो करवीर तालुक्यातील तामगाव येथील रहिवासी आहे. काम सुरु असताना अचानक गौतमने काहीलीमध्ये उडी मारली. ज्यावेळी गौतमने काहीलीमध्ये उडी मारली त्यावेळी काहीलीमधील गुळ बनवण्याची शेवटची प्रक्रिया सुरु होती. उसाचा रस उकळत असतानाच त्याने त्यामध्ये उडी मारली. या घटनेचा सर्व प्रकार गुऱ्हाळ घरातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

राधानगरी पोलिसांचा तपास सुरु

आसपास काम करणाऱ्या कामगारांची ताबडतोब गौतमला काहीलीच्या बाहेर काढले. तोपर्यंत संतोष हा पूर्णपणे भाजला गेला होता. त्यांनी त्याला ताबडतोब कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल केले. गौतम ९५ टक्के भाजला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. राधानगरी पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सरु आहे. दरम्यान, आर्थिक विवंचना किंवा कौटुंबिक वादातून गौतमने आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.