स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून कोल्हापुरातील शिवसैनिकाचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर अनके नेते शिंदे गटात सामील होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निष्ठावंत शिवसैनिकांबरोबर बैठका घेण्याचा धडाका लावला आहे. ते शिवसैनिकांना सातत्याने दिलासा देत आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील एका शिवसैनिकांने उद्धव ठाकरे यांना स्वत:च्या रक्ताने पत्र लिहीले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील टोप येथील शिवसैनिकांनी स्वत:च्या रक्ताने पत्र लिहीले आहे. या शिवसैनिकाचे नाव सुरज विलास पाटील असून त्यांने हे पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांना दिले आहे. या पत्रात शिवसैनिकांने उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे.

 त्या पत्रात काय –

या पत्रात मा. श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मी शिवसैनिक म्हणून बिनशर्त पाठिंबा देत आहे, असे लिहिले आहे.

खासदार मंडलिक आणि माने शिंदे गटात –

संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे शिंदे गटात दाखल झाले आहेत. दरम्यान संजय मंडलिक यांनी  बंडखोरीनंतर  सातत्याने शिवसेनेसोबत असल्याचे दाखवन्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मतदारसंघातील आडाखा पाहून 2024 मध्ये भाजपच्या मदतीने उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी बंड केल्याच्या चर्चा सुरू आहेत.