Eco friendly bappa Competition
घर गणेशोत्सव 2023 कोकणात जाणाऱ्या गाड्या 3 ते 4 तास उशीरा; दिवा रेल्वे स्थानकावर चाकरमान्यांची...

कोकणात जाणाऱ्या गाड्या 3 ते 4 तास उशीरा; दिवा रेल्वे स्थानकावर चाकरमान्यांची मोठी गर्दी

Subscribe

मुंबई : राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जाता. उद्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. मुंबईतील मोठ्या गणेश मंडळात बाप्पाचे मोठ्या धुमधाममध्ये आगमन देखील झाले आहे. कोकणातील गणेशोत्सवाची मज्जा काही औरच असते. यासाठी चाकरमानी गणपतीसाठी कोकणात जात. कोकणत घरोघरी बाप्पाचे आगमन होते. कोकणात जाण्यासाठी पाच ते सहा महिन्यापूर्वी रेल्वेचे तिकटी काढले जाते. तसेच राज्य सरकारकडून देखील कोकणता जाणाऱ्या चाकरमान्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात येतात.

आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झालेल्या कोकणातील चाकरमान्यांनी कोकणात जाण्यासाठी एकच गर्दी केलेली बघायला मिळाली. दिवा रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी असून शनिवारपासूनच चाकरमानी आपल्या गावाकडे रवाना होतायत. मिळेल त्या वाहनांनी गावी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. मुंबई ठाणे परिसरातून बसेसही रवाना करण्यात आल्यात. रेल्वेने गाड्या वाढवल्या असल्या तरी त्याही कमी पडल्याचे दिसून येते. मंगळवारी गणपती आगमन होत असताना दोन ते तीन दिवस आधीच चाकरमानी गावी जात आसल्याने प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून येते.

- Advertisement -

हेही वाचा – खुशखबर! कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी राज्य सरकारचा निर्णय

गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कोकणात जाणाऱ्या सर्वच ट्रेन ३ ते ४ तास उशिरानं धावत आहेत. त्यामुळे दादर, ठाणे, दिवा स्थानकांत प्रवाशांची गर्दी वाढू लागलीये. मध्य रेल्वेचेही वेळापत्रक कोलमडले. रेल्वे वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचे पाहिला मिळाले. दरम्यान या भयंकर गर्दीचा दिवा रेल्वे स्टेशनवर कोकणात जायला निघालेल्या महीला, पुरुष, लहान मुले यांचे या आतोनात हाल होताना पहायला मीळाले प्रशासनाकडून प्रवाशांची गैरसोय केलीली दिवा रेल्वे स्थानकावर दिसून येतेय.

- Advertisement -

 

- Advertisment -