घरमहाराष्ट्रकोकणात आगामी निवडणुकांमध्ये कुणबी समाज बजावणार निर्णायक भूमिका? 'या' दोन सभामधून चित्र...

कोकणात आगामी निवडणुकांमध्ये कुणबी समाज बजावणार निर्णायक भूमिका? ‘या’ दोन सभामधून चित्र होणार स्पष्ट

Subscribe

कोकणात आगामी निवडणुकांमध्ये कुणबी समाजाच्या वोट बँकेवरून राजकारण रंगण्याची शक्यता आहे. यासाठी लोकसभा, विधानसभा आणि अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुणबी समाज एकत्र येत निर्णायक भूमिका बजावणार अशी चर्चा रंगतेय. सध्या राज्यात कुणबी जोडो अभियानांतर्गत कुणबी समाजाच्या काही प्रमुख नेत्यांनी या समाजाला एकत्र आणण्यासाठी जिल्ह्यानुसार एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. या अभियानाला कुणबी समाजाचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा नेत्यांकडून केला जात आहे.

कुणबी समाज स्थापन करणार राजकीय संघटना

आगामी काळात राज्यात कुणबी समाज एक वेगळी राजकीय संघटना स्थापन करण्याच्या तयारीत आहे. यासाठी 8 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारीदरम्यान ठाण्यात लाखो संख्येने कुणबी समाजाला एकत्र आणण्याचे नियोजन सुरु आहे. तर मे महिन्यात शिवाजी पार्कवर मोठ्या सभेचे आयोजन करण्याचा प्लॅन आखला जात आहे. यासाठी रत्नागिरीतील नाणार रिफायनरी विरोधात लढणारे कुणबी समाजाचे नेते अशोक वालम यांनी नियोजन केले आहे. दरम्यान मे महिन्यात होणाऱ्या सभेनंतर कुणबी समाज एक वेगळा राजकीय संघटना स्थापन करु शकतो. आगामी विधानसभा निवडणुकीत कोकणातील काही मतदारसंघांमध्ये कुणबी समाजाच्या मतदारसंघांमध्ये कुणबी समाजाची सर्वाधिक टक्केवारी पाहता काही कुणबी संघटना किंवा कुणबी समाजाचे नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दरम्यान ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत कुणबी समाजाची संख्या मोठी आहे. पण राजकारणात कुणबी समाज म्हणावा तसा सक्रिय नाही. कुणबी समाजाच्या मतदानामुळे आमदार, खासदार निवडणू येतात, निवडणुकांमध्ये कुणबी समाजाची निर्णायक भूमिका बजावतो. पण कुणबी समाजाचा आमदार, खासदार किंवा लोकप्रतिनिधी नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी कुणबी समाजाची ताकद आहे, त्या ठिकाणी कुणबी समाजाचा लोकप्रतिनिधी निवडूण आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल, यासाठी कुणबी समाजाने एकत्र येण्याचं आवाहन केलं जात आहे.

या समाजाचे आत्तापर्यंत झालेले मेळावे, कुणबी जोडो अभियान याला चांगला प्रतिसाद मिळाला, आगामी काळातही तो वाढेल अशी कुणबी नेत्यांची समज आहे. त्यामुळे कुणबी समाजाला कुणीही, कोणतेही राजकीय पक्षाने किंवा नेत्याने आम्हाला गृहित धरु नये. तसेच कुणबी समाज आता राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहोत. आमच्या संघटनेचे नाव, ध्येयधोरणं लवकरच स्पष्ट करु असं कुणबी समाजाच्या नेत्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

कोकणातील कुणबी समाजाची संख्या जवळपास 60 ते 70 च्या दरम्यान आहे. त्यामुळे कुणबी समाजाची मत निर्णायक ठरणार आहे. कुणबी समाजाच्या नेत्यांकडून कोकणात मोर्चा बांधणी सुरु आहे. यात राजापूरमधील प्रस्तावित रिफायनरीलाही विरोध हा यातील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण पनवेलमध्ये कुणबी जोडो अभियानात रिफायनरी विरोधात निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यात रिफायनरी आंदोलनाला आणखी पाठबळ कसं मिळेल यासाठी तयारी सुरु आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -