महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणने दरपत्रक ठरवून दिले आहे. कोणत्याही खासगी बस वाहतूकदाराने या दराच्या 50 टक्के अधिक (दीडपट) आकारणी करण्यास परवानगी असून, या दराच्या दीडपटापेक्षा जास्त भाडे आकारणी झाल्यास प्रवाशांनी 02352-225444 या व्हॉटस्ॲप क्रमांकावर वाहन, वाहनाचा नोंदणी क्रमांक व भाडे आकारणी तिकीट यांच्या फोटोसह तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी केले आहे. (Konkan Ganapati festival Private buses charge more Now passengers can complain )
प्रवासाचा मार्ग रत्नागिरी ते मुंबई अनुक्रमे– साधे 525 रुपये, शिवशाही (वातानुकुलित) 815 रुपये, शयनयान (विना वातानुकुलित) 710 रुपये. रत्नागिरी ते ठाणे – 505 रुपये, 750 रुपये, 690 रुपये. रत्नागिरी ते बोरीवली – 550 रुपये, 815 रुपये, 750 रुपये. रत्नागिरी ते पुणे/पिंपरी – 490 रुपये, 725 रुपये, 665 रुपये. चिपळूण ते मुंबई – 390 रुपये, 585 रुपये, 535 रुपये. चिपळूण ते पुणे – 360 रुपये, 530 रुपये, 485 रुपये. दापोली ते मुंबई – 350 रुपये, 520 रुपये, 475 रुपये. दापोली ते ठाणे – 360 रुपये, 530 रुपये, 485 रुपये. दापोली ते बोरोवली – 375 रुपये, 555 रुपये, 510 रुपये. व दापोली ते पुणे/पिंपरी – 350 रुपये, 520 रुपये, 475 रुपये. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने शेअर रिक्षा थांबे व दरपत्रक देखील ठरवून दिलेले आहेत.त्यानुसारच प्रवाशांनी भाडे द्यावेत, असे कळविण्यात आले आहेत.
गणपतीसाठी विशेष एसटी बसेस
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यंदादेखील गणेशोत्सवासाठी सज्ज झाला आहे. यावर्षीही या महामंडळाच्या ठाणे विभागाने कोकणात गाड्या सोडण्याचा नियोजनात गतवर्षापेक्षा 500 जादा गाड्यांचे सोडण्याचे नियोजन केल्याने यंदा 1 हजार 500 गाड्या तिकीट आणि ग्रुप आरक्षणासाठी लावण्यात आल्या आहेत. यामध्ये ग्रुप आरक्षणावर विशेष भर दिला आहे. तर ठाणे आगारातील ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि बोरिवली येथून यंदा तब्बल 1 हजार 252 बसेस आरक्षणासाठी उपलब्ध झाल्या आहेत. तर नियोजन केलेल्या गाड्यांची संख्या आकडेवारीवरून गेल्या दोन वर्षात जवळपास दुप्पटीच्या आसपास वाढली आहे अशी माहिती ठाणे विभागाने दिली आहे.
(हेही वाचा: राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांचा ‘या’ जिल्ह्यांत क्षेत्रपाहणी दौरा )