घरमहाराष्ट्ररिफायनरी कोकणातच होणार! पेट्रोलियम मंत्र्यांची राजापूरच्या 'या' गावांना पसंती

रिफायनरी कोकणातच होणार! पेट्रोलियम मंत्र्यांची राजापूरच्या ‘या’ गावांना पसंती

Subscribe

मुंबई : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील रिफायनरीला झालेल्या तीव्र विरोधानंतर हा प्रकल्प रद्द करण्यात आला, मात्र हा प्रकल्प आता राजापूर तालुक्यातील बारसू आणि सालेगावमध्ये करण्याचा केंद्राचा प्रस्ताव आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलीकडेच दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या दिल्ली दौऱ्यादरम्यान नाणार कोकणातच करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे म्हटले जातेय. कारण कोकणातल्या रिफायनरीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे, राजापूरमधील बारसू आणि सालेगावला केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पसंती दर्शवल्याचे समोर आले आहे. कोकणातील रिफायनरीसाठी राजापूरमधील बारसू आणि सालेगावला मंजुरी देण्याबाबत केंद्रीय मंत्री पुरी आण उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याच सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले जातेय.

मात्र या प्रकल्पाला राजापूरमधील बारसू आणि सालेगावमध्ये स्थानिक पातळीवरील समर्थन, जमीन मालकांची परवानगी आणि विरोध याचा सारासार विचार केला जाईल, दरम्यान यासाठी केंद्रीय मंत्री आणि राज्यातील मंत्र्यांमध्ये बैठकांच्या अनेक फेऱ्या होणार आहे. उदय सामंत यांनी उद्योगमंत्री पद हाती घेतल्यापासून कोकणातल्या रिफायनरीबाबतच्या घडामोडींना सध्या वेग आला आहे. यात शिवसेनेचे स्थानिक आमदार राजन साळवी यांनी देखील रिफायनरीला समर्थन दिले आहे. रिफायनरीला माझा पाठींबा असल्याची प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिली होती.

- Advertisement -

गेल्या कित्येक दिवसांपासून नाणार प्रकल्प हा कोकणातील संवेदनशील विषय बनला आहे. कोकणात अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाऊ नये, यासाठी तेथील स्थानिक नागरिक आंदोलने करत आहे. नाणार प्रकल्पामुळे निसर्गाचा ऱ्हास होईल आणि कोकणातील वातावरण असंतुलित होऊ शकते. त्यामुळे तेथील स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पामुळे तेथील आजूबाजूच्या स्थानिकांना भविष्यात भयावक गोष्टींना सामोरे जावे लागू शकते. असे म्हटले जात आहे. मात्र रिफायनरी प्रकल्पासाठी नाणारऐवजी राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव परिसरातील १३ हजार एकर जागा देण्याची तयारी मागील ठाकरे सरकारने दाखवल्याची माहिती पुढे आली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जानेवारी २०२१ महिन्यात पत्र लिहून पर्यायी जागेसंदर्भातील प्रस्ताव दिल्याचे म्हटले जात आहे.


Live Update : काँग्रेस अध्यक्षपदासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -