Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कोकण रेल्वे : तिकीट बुकिंगमधील गैरव्यवहाराविरोधात सर्वपक्षांची एकजुट

कोकण रेल्वे : तिकीट बुकिंगमधील गैरव्यवहाराविरोधात सर्वपक्षांची एकजुट

Subscribe

यंदा १९ सप्टेंबरला गणेशचतुर्थीला सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी दोन दिवसांचे म्हणजेच १७ सप्टेंबरची कोकण रेल्वेच्या गाड्यांची तिकीटं एका मिनिटांत बुक झाली. अवघ्या मिनिटांमध्ये हे आरक्षण फुल्ल झाल्यामुळे चाकरमान्यांमध्ये संतपाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र आता कोकण रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आणि तिकीट बुकिंगमधील गैरव्यवहाराविरोधात सर्वपक्षांची एकजुट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कोकणातील सर्वात मोठा आणि आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. याच गणेशोत्सवाला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात. यंदा १९ सप्टेंबरला गणेशचतुर्थीला सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी दोन दिवसांचे म्हणजेच १७ सप्टेंबरची कोकण रेल्वेच्या गाड्यांची तिकीटं एका मिनिटांत बुक झाली. अवघ्या मिनिटांमध्ये हे आरक्षण फुल्ल झाल्यामुळे चाकरमान्यांमध्ये संतपाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र आता कोकण रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आणि तिकीट बुकिंगमधील गैरव्यवहाराविरोधात सर्वपक्षांची एकजुट झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Konkan Railway All parties unite against ticket booking mns raju patil BJP Nitesh Rane NCP Ajit Pawar Shiv Sena Vinayak Raut central Railway)

तिकीट बुकिंगमधील गैरव्यवहाराविरोधात राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिलं आहे. तसेच, शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार विनायक राऊत कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची भेट घेणार आहेत. तसेच, भाजपा आमदार नितेश राणेही कोकणातील प्रवाशांसाठी पुढे सरसावले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येत्या सोमवारी देशाच्या रेल्वेमंत्र्यासोबत दिल्लीला एका बैठकीचं आयोजन केल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. शिवाय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी यासंदर्भात पत्र लिहिले आहे.

- Advertisement -

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र

एका अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर आपले लक्ष वेधतो की, गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आणि विशेषतः कोकणवासीयांच्या अस्मितेचा, श्रध्देचा निकाल्याचा आणि संस्कृतीचा विषय आहे. गणेशोत्सवाची वाट प्रत्येक मराठी माणूस आणि विशेषतः कोकणवासीय वर्षभर बघत असतो. कामानिमित्त जगाच्या कोणत्याही कानाकोपन्यात असला, कितीही अडचणी असल्या तरी कोकणवासीय चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जातोच. त्याची तयारी व नियोजन प्रत्येक कोकणवासीय चाकरमानी अगदी वर्षभरापासून करत असतो. गणेशोत्सव हा कोकणाचा मोलाचा ठेवा सांस्कृतिक संचित आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. तसेच या महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट आहे. या महामार्गावरून प्रवास करणे अत्यंत त्रासदायक आहे. त्यामुळे रस्त्याने प्रवास करणे हा पर्याय सुध्दा व्यवहार्य ठरत नाही. कोकणाला जोडण्यासाठी तसेच कोकणवासीय चाकरमान्यांच्या सोईसाठी महत्वकांक्षी कोकण रेल्वेची निर्मिती करण्यात आली आहे. कोकण रेल्वे ही कोकणवासीयांची जीवनवाहिनी आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना आतापासूनच प्रतिक्षा यादीचे फलक लागले आहेत. मुंबईच्या छत्रपती टर्मिनसवरून दि. १५ सप्टेंबरला सुटणान्या कोकणकन्या एक्सप्रेसची प्रतिक्षायादी अवघ्या दीड मिनीटातच हजारापार गेल्याची बाब समोर आली आहे. तर दि. १६ सप्टेंबरचे आरक्षण करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना सर्वच गाड्यांसमोर रिप्रंट हा मेसेज येत आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात कोकणात जाणान्या रेल्वे गाड्यांच्या आरक्षणात गैरप्रकार होत असावेत, अशी शंका घेण्यास वाव आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.

गणेशोत्सवासाठी गावी जाण्याचा निर्धार केलेले हजारो चाकरमानी तीन महिने अधिपासूनच गावी जाण्या-येण्याचे नियोजन करत असतात. त्यासाठी रात्रभर जागून कोकण रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळविण्याचा प्रयत्न करत असतात. पैदा गणेशोत्सव दि. २९ सप्टेंबर रोजी सुरु होत आहे. त्यामुळे त्याआधीच्या किमान दोन दिवसांचे म्हणजे दि. १७ सप्टेंबरचे या प्रवसाच्या तारखेचे १२० दिवस आधीचे आरक्षण शुक्रवारी खुले झाले. मात्र पहिल्याच दिवशी अवघ्या एक ते दोन मिनिटात आरक्षण पूर्ण झाले तर प्रतिक्षायादीचे लांबच्या लांब फलक लागले आहेत. हा प्रकार म्हणजे रेल्वेच्या आरक्षणात गैरप्रकार होत असण्याची शक्यता अधिक आहे. रेल्वे तिकीटाची अवैध बिक्री दलाल मोठ्या संख्येने तिकीटांचे आरक्षण करून ते चया दराने विक्री करत असल्याचा आजपर्यंतचा अनेकांचा अनुभव आहे. सर्वसामान्य प्रवासी सण उत्सवाला गावी जात असतात त्यावेळीच दलालांकडून मोठ्या संख्येने आरक्षण करून चढ्या दराने विक्री करण्याचे रकेट सुरु आहे. यामध्ये कोणा-कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत.

या गैरप्रकारात कोण-कोण सामील आहे. याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे या तिकोटाच्या आरक्षणांची मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वने चौकशी करावी. अशा रेल्वे दलालांवर नियंत्रण ठेवावे. तसेच कोकणच्या चाकरमान्यांच्या सोईसाठी गणेशोत्सव काळात अतिरिक्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्यात याव्यात, ही विनंती.

मा. मंत्री (रेल्वे) म्हणून या अत्यंत संवेदशील विषयात आपण स्वतः लक्ष घालून यावर योग्य ती कारवाई करण्याचे निदेश संबंधितांना देण्यात यावेत. प्रत्येक कोकणवासीच्यावतीने मी आपल्याला या पत्राव्दारे विनंती करीत आहे.

विनायक राऊत कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेणार

गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्या प्रवाशांच्या बुकिंग संदर्भात अनेक तक्रारी आलेल्या आहेत. याबाबत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार विनायक राऊत हे गुरुवार (२५ मे) रोजी कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची भेट घेणार आहेत. तसेच, ‘ज्या प्रवाशांकडे अधिकची माहिती असेल, त्यांनी कृपया [email protected] या ईमेल आयडी वर पाठवावी’, अशी विनंतीही विनायक राऊत यांनी केली.

मनसे आमदार राजू पाटील यांचे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र

गौरी-गणपती निमित्त मुंबई, ठाणे परिसरातून लाखो भाविक रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या मुळ गावी जात असतात. मात्र यावर्षीच्या गौरी गणपती दरम्यानच्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुरु झाले. आहे. परंतु, तिकिट आरक्षित करून सुरक्षित प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्या बंधू-भगिनींचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. कोकणात गणपती निमित्त जाणारे बांधव आरक्षित तिकिट मिळावे म्हणून रात्रभर तिकिट रांगेमध्ये उभे असतात, परंतु आरक्षण सुरु झाल्यानंतर पहिल्या मिनिटातच हे फूल झाल्याचे दिसून येते. साधे वेटिंगमधील तिकिटही मिळत नाही अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत रेल्वे मंत्रालय कोणतीही भूमिका जाहिर करीत नाही, धीर देण्याचा प्रयत्न करीत नाही.

वर्षांनुवर्षे केवळ गृहित धरण्याचा प्रयत्न करीत आहे. वास्तविक दरवर्षी अशीच परिस्थिती उद्धमत असते. रेल्वे मंत्रालय मात्र यावर कोणताही तोडगा काढत नाही. दलालांच्या हातात आज सर्व आरक्षण असून परराज्यातून सर्रासपणे तिकिट बूक होतात. असे असतानाही रेल्वे मंत्रालयाला कोणतेही गांभिर्य नाही. एवढी भयानक परिस्थिती असताना साधी चौकशीही होत नसल्यामुळे दलालांना संधी मिळते. वर्षानुवर्षे त्याची झळ कोकण बांधवांना सहन करावी लागत आहे. तरी आपण तातडीने लक्ष घालून सर्व गाड्यांच्या आरक्षणाचा आढावा घ्यावा, नवीन गाड्यांचे नियोजन आताच करून गौरीगणपती निमित्त जाणाऱ्या सर्व भाविकांना आरक्षित तिकीट मिळून सुखकर प्रवास होईल याची काळजी घ्यावी ही विनंती.

केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडून रेल्वेमंत्र्यासोबत बैठकीचं आयोजन – नितेश राणे

नितेश राणे यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दखल घेतल्याचे सांगितले आहे. गणेशचतुर्थीला कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची बुकिंग फुल्ल झाली आहे. त्यामुळे या बुकिंगमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आढळून आला आहे. काही मिनिटांमध्येच या बुकिंग फुल्ल झाल्या आहेत. यासंबंधीत असंख्य चाकरमानी आणि कोकणवासीयांनी आमच्याशी संपर्क साधला. त्यामुळे आम्ही याची दखल घेतली असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येत्या सोमवारी देशाच्या रेल्वेमंत्र्यासोबत दिल्लीला एका बैठकीचं आयोजन केलं आहे. जेणेकरून ज्या प्रकारचा त्रास कोकणवासीयांना होतोय. तो सर्व त्रास दूर करण्यात येईल आणि गणेशचतुर्थीसाठी त्यांचा प्रवास सुखकर करण्यात येईल, असं आमदार नितेश राणे म्हणाले.

तिकीट बुकींमध्ये कुठलाही काळाबाजार नाही – डॉ. शिवराज मानसपूरे

एकीकडे अवघ्या पाच मिनिटांत कोकण रेल्वेच्या सर्व तिकीट बुक झाल्याबाबत सर्वपक्षीय नेतेमंडळी रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वे मंत्रालयाच्या भेटी घेणार आहेत. तर, दुसरीकडे मात्र ‘प्रवाशांनीच रेल्वेच्या तिकीट बुक केलेल्या आहेत. यामध्ये कोणाचा हस्तक्षेप नाही. कुठलाही काळाबाजार नाही’, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपूरे यांनी सांगितले.


हेही वाचा – …तर राज्यात नाही फक्त केंद्रातच निवडणुका होतील; उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

- Advertisment -