घरताज्या घडामोडीकोकण रेल्वेमध्ये परीक्षेविनाच मेगा भरती, किती आहेत रिक्त पदं?

कोकण रेल्वेमध्ये परीक्षेविनाच मेगा भरती, किती आहेत रिक्त पदं?

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने परीक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक असो वा खासगी क्षेत्रात नोकऱ्यांच्या अनेकविध संधी प्राप्त होताना दिसत आहेत. अशातच कोकण रेल्वेकडून नोकरीची सुवर्णसंधी देण्यात आली आहे. इच्छूक असणाऱ्या उमेदवारांनी कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

कोकण रेल्वे कॉर्पेरेशन लिमिटेडने वरिष्ठ आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. मुलाखतीच्या आधारे या पदांच्या भरतीसाठी उमदेवारांची निवड करण्यात येणार आहे. तसेच एकूण १४ रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. कोकण रेल्वेने जारी केलेल्या सुचिनेनुसार, या प्रक्रियेद्वारे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकच्या ७ आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यकच्या ७ पदांचा समावेश आहे. कोकण रेल्वेच्या भरती प्रक्रियेसाठी ११ मे, १३ मे आणि १४ मे २०२२ रोजी सुरूवात होणार आहे.

- Advertisement -

नोंदणी फक्त मुलाखतीच्या तारखेला सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या वेळेत करता येणार आहे. या सर्व मुलाखती जम्मू-काश्मीरमध्ये होणार आहेत. या भरतीसाठीची मुलाखत यूएसबीएलआर प्रकल्प मुख्यालय, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सत्यम कॉम्प्लेक्स, मार्बल मार्केट, एक्स्टेंन- त्रिकुटा नगर, जम्मू, जम्मू आणि काश्मीर पिनकोड – १८००११ येथे होणार आहे.

तांत्रिक सहाय्यकाच्या या पदांच्या भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून जवळपास ६० टक्के गुणांसह संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.

- Advertisement -

हेही वाचा : नियमाच्या पलीकडे गेल्यावर गुन्हे दाखल होणारच, नाना पटोलेंची खोचक टीका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -