Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने घेतला मोठा निर्णय

कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने घेतला मोठा निर्णय

Subscribe

कोकणवासियांना लवकरच वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे. कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे. कोकणात आता वंदे भारत एक्स्प्रेसने जाता येणार आहे.

कोकणवासियांना लवकरच वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे. कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे. कोकणात आता वंदे भारत एक्स्प्रेसने जाता येणार आहे. कारण कोकण रेल्वे मार्गावरुन वंदे भारत एक्स्प्रेस धावली आहे. मुंबईपासून गोव्याच्या दिशेने करण्यात आलेली प्राथमिक चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे आता वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते मडगाव धावणार आहे. त्यामुळे आता कोकणवासियांना आरामदायी प्रवास करता येणार आहे. ( Konkan railway now Vand Bharat Train will run between Mumabi to Madgaon )

मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी हायस्पीडमध्ये रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी घेतली गेली आहे. मुंबई ते मडगाव मार्गावर आज मंगळवारी यशस्वी चाचणी घेतली गेली आहे. या वंदे भारत रेल्वेचाच वेग चांगला असल्यानं कमी वेळात गोव्यात पोहोचता येणार आहे. या गाडीचा कमाल 180 किमी प्रति तास वेग आहे. या अत्याधुनिक रेल्वेमध्ये जीपीएस बेस्ड पॅसेंजर इन्फॉर्मेशन सीस्टम, बायो टॉयलेट्स, अॅटोमेटिक दरवाजे, वायफाय आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टिम आहे.

तेजस पाठोपाठ आता वंदे भारत कोकणात धावणार

- Advertisement -

देशातील पहिली तेजस एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावर धावली होती. ही एक्स्प्रेस सुरु आहे. तसचं, डबल डेकर रेल्वेही या मार्गावर सुरु करण्यात आली होती. आता मुंबई ते गोवा वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. त्यामुळे आरामदायी प्रवास करता येणार आहे. देशभरातील विविध मार्गांवर मेक इन इंडिया अंतर्गत भारतात विकसित केलेली वंदे भारत एक्स्प्रेस धावी लागली आहे. 16 डब्ब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस मंगळवारी पहाटे 5:35 वाजता सीएसएमटी स्थानकातून सुटली. ती गोव्यात मडगावला दुपारी 2:30 वाजता पोहण्याची शक्यता आहे. वंदे भारत ही ट्रेन मेक इन इंडियाच्या अंतर्गत बनवण्यात आली आहे. ही एक्स्प्रेस सध्या प्रतिष्ठेची रेल्वे आहे.

( हेही वाचा: शिंदेंचा पोपट मेलाय फक्त अध्यक्षांनी जाहीर करणं बाकी; राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल )

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -