घरमहाराष्ट्रकोकण रेल्वे प्रवास आता 'सुपरफास्ट', विद्युतीकरण प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

कोकण रेल्वे प्रवास आता ‘सुपरफास्ट’, विद्युतीकरण प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

Subscribe

कोकणातील मुसळधार पाऊस आणि विद्युतीकरणाच्या कामातील अडचणी पार करत अखेर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे

भारतीय रेल्वे मार्गातील सर्वात आव्हानात्मक मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकण रेल्वेचा प्रवास हा आता आणखी सुपरफास्ट होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या प्रकल्पाचं लोकापर्ण करणार आहेत. गेल्या सात वर्षांपासून कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम सुरु होते. या विद्युतीकरणामुळे आता कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास प्रदुषणमुक्त होण्याबरोबरचं अधि क सुस्साट होणार आहे.

कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले नसल्याने आत्तापर्यंत सर्व रेल्वे या डिझेल इंजिनाच्या मदतीने धावत होत्या. मात्र रेल्वे मंत्रालयाने 2016 रोजी कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणास मंजुरी दिली, यामुळे रत्नागिरी ते थिविम मार्गावरील विद्युतीकरण पूर्ण झाले असल्याने कोकण रेल्वेच्या अखत्यारितील एकूण 741 किलोमीटर मार्ग हा विद्युत मार्ग असणार आहे. या विद्युतीकरण प्रकल्पासाठी एकूण 1287 कोटींचा खर्च आला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोकण रेल्वेच्या मार्गावरील विद्युतीकरणाचा लोकापर्ण सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावणार आहे. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी, उडपी आणि मडगांव रेल्वे स्थानकावर हा लोकार्पण सोहळा पार पडेल. यासाठी रत्नागिरी स्थानकावर जोरदार तयारी करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान सध्या डिझेलवर धावत असलेल्या कोकण रेल्वेच्या साधारण 12 डब्ब्यांच्या रेल्वेला एक किलोमीटर अंतरासाठी 6 ते 10 लिटर डिझेलची आवश्यकता असते. मात्र इंधनाच्या तुटवड्यामुळे रेल्वेच्या रचनेत बदल केला जातोय. यानुसार कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणामुळे इंधनाची बचत होणार असून प्रवाशांना वेगवान आणि प्रदुषणमुक्त वातावरणात प्रवास करता येणार आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून 22 आणि 24 मार्च रोजी तपासणी पूर्ण झाली. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मंजुरी दिल्याने आता कोकण रेल्वे विजेवर धावण्यास सज्ज झाली आहे.

कोकण रेल्वे मार्ग हा देशातील आव्हानात्मक रेल्वे मार्ग म्हणून ओळखला जातो. यात कोरोना महामारीच्या काळात हा प्रकल्प पूर्ण करणे केंद्र सरकारसमोरील आव्हानात्मक काम होते. कोकणातील मुसळधार पाऊस आणि विद्युतीकरणाच्या कामातील अडचणी पार करत अखेर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.


अग्निवीरांसाठी आनंद महिंद्रांची मोठी घोषणा, महिंद्रा ग्रुपमध्ये नोकरीची ऑफर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -