घरमहाराष्ट्रकोकण रेल्वेचा पाच तास खोळंबा; चाकरमान्यांचे प्रचंड हाल

कोकण रेल्वेचा पाच तास खोळंबा; चाकरमान्यांचे प्रचंड हाल

Subscribe

कोकणात जाणाऱ्या गाड्या तब्बल पाच तास उशीराने धावत असल्याने बुधवारी निघालेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले आहेत.

आज राज्यभरात ‘बाप्पा’चे मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे. तर बरेच चाकरमानी गणपतीनिमित्त कोकणात आठ दिवस आधीच दाखल झाले आहेत. तर काही कोकणवासी बुधवारी कोकणात जायला निघाले त्या चाकरमान्यांचा मात्र खोळंबा झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. कोकणात जाणाऱ्या गाड्या तब्बल पाच तास उशीराने धावत असल्याने गावाला निघालेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले आहेत.

कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडले

कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले असल्याने कोकणात जाणाऱ्या भाविकांचे प्रचंड हाल झाले आहेत. कोकणात जाणारे अनेक भाविक आज बाप्पा येणार म्हणून बुधवारी रात्री निघणाऱ्या कोकण गाड्यांने निघाले होते. मात्र कोकणात जाणाऱ्या काही गाड्या अर्धा तास उशीराने धावत आहेत तर काही गाड्यांना पाच तास उशीराने धावत असल्याने चाकरमानी हैराण झाले आहेत. चाकरमान्यांना मनस्तापाला सामोरे जावं लागत आहे.

- Advertisement -

का झाला गाड्यांचा खोळंबा

गणपतीत मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे तुफान गर्दी असल्याने कोकणात जादा गाड्या सोडण्यात येतात. या जादा गाड्यांमुळे अनेक गाड्यांचा खोळंबा देखील होतो. तसेच ट्रेन बंचिंगमुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने गाड्या एकामागे एक थांबल्या आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्वच गाड्यांचा खोळंबा झाल्याचे, समोर आले आहे.

या गाड्या वेळेत

काही गाड्या वेळेत धावत आहे तर काही गाड्यांचा खोळंबा झाला आहे. डाऊन मांडवी, डबल डेकर, दुरांतो, हापा, निझामुद्दीन एक्सप्रेस या गाड्या वेळेत धावत असून या गाड्या वगळता बाकी सर्व गाड्या उशीराने धावत असल्याची माहिती समोर आली आहे.

या गाड्या उशीराने धावत आहेत

  • सावंतवाडी – पुणे दीड तास उशीराने
  • झाराप – पुणे विशेष तीन तास उशीराने
  • मंगलोर – वांद्रे विकली स्पेशल पाच तास उशिराने
  • २२६३० तिरुनवेली – दादर साडे तीन तास उशिराने
  • रत्नागिरी – दादर पॅसेंजर दोन तास उशिराने
  • ०१००७ दिवा – सावंतवाडी पॅसेंजर दीड तास उशिराने
  • २२१२० तेजस एक तास उशिराने
  • २२११५ लोकमान्य टिळक – करमाळी एसी सुपरफास्ट अडीच
  • १६३४६ नेत्रावती अर्धा तास उशिराने
  • १२४३२ राजधानी एक्सप्रेस एक तास उशिराने
  • १२०५१ जनशताब्दी एक्सप्रेस अर्धा तास उशिराने
  • ११००३ तुतारी ५५ मिनिटे उशिराने
  • १०१११ कोकण कन्या एकस्प्रेस अडीच तास उशिराने
  • १०१० अप मांडवी एकस्प्रेस एक तास २० मिनिटे उशिराने
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -