शिवसेना ( ठाकरे गट ) नेते, आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटातील रामदास कदम, मंत्री दीपक केसकर, भाजपचे नेते नितेश राणे आणि शिवसेनेचे नेते, निलेश राणे यांचा समाचार घेतला आहे. रामदास कदम नाग, केसकरांना 50 खोके मिळाले, तर राणे बंधूंचा चंगू आणि मंगू, असा उल्लेख करत भास्कर जाधव यांनी हल्लाबोल केला आहे.
भास्कर जाधव म्हणाले, “मला भाजपला सांगायचंय की, रामदास कदम हे सरपटणारे नाग आहेत भाजपवाल्यांनी या नागाला दुखावलं आहे. त्यामुळे हा नाग बिळामध्ये गप्प बसला आहे. तो तुम्हाला निवडणुकीनंतर डंक मारल्याशिवाय राहणार नाही. हे मी 100 टक्के सांगतो.”
हेही वाचा : महाविकास आघाडीत फाटलं! “सुनील केदार गद्दार, ते मारूतीच्या बेंबीत बसलेले…”, भास्कर जाधव भडकले
“ही निवडणूक जशी गद्दार विरुद्ध खुद्दार आहे. तशीच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, अशीही निवडणूक आहे. धनशक्ती 50 खोक्यांमधून सावंतवाडीचे दीपक केसकर यांच्याकडे गेली. त्यांच्याविरोधात सावंतवाडीतून सामान्यातील सामान्य शिवसेनेचे राजन तेली लढत आहेत,” असं भास्कर जाधव यांनी सांगितलं.
“कुडाळ येथे एका चंगू ( निलेश राणे ) समोर माझा सहकारी वैभव नाईक निवडणूक लढत आहे. तर सिंधुदुर्गात दुसऱ्या मंगूसमोर ( नितेश राणे ) आमचा संदेश पारकर निवडणूक लढवत आहे,” असं भास्कर जाधव यांनी म्हटलं.
हेही वाचा : “आम्ही धर्म वाचवत बसू अन् फडणवीसांच्या पत्नी…”, कन्हैया कुमारांची फटकेबाजी