कणकवली : महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील पटांगणात उपस्थित होते. महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे हे पहिल्यांदाच सभेला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, मला जुगार खेळता येत नाही, पण मी 5 वर्षातून एकदा जुगार खेळतो.
राज ठाकरे म्हणाले की, मी पक्षाची स्थापना केली, तेव्हा एक उदाहरण दिले होते. आज पुन्हा ते उदाहरण देतो. मी मलेशियाला गेलो होतो. तिथे जेंटिक हायलंड नावाची एक जागा आहे. आता तिथे अनेक लोक गेले असतील. मी जेव्हा गेलो तेव्हा तिथे केवळ एक हॉटले होत. साधारण ते मुंबई ते माथेरान एवढं अंतर होतं. तिथे पोहोचलो आणि विचारपूस केली, काय आहे इथे? ते म्हणाले इथं कसिनो आहे. त्यानंतर मी संध्याकाळी शर्मिला आणि बरोबरच्या दोन तीन जणांबरोबर खाली कसिनोमध्ये गेलो. मला जुगार खेळता येत नाही. मी 5 वर्षातून एकदा जुगार खेळतो. आतमध्ये गेलो तिकडे भिंगऱ्या भिंगऱ्या फिरवत होते. मी 10 मिनिटांत बाहेर पडलो आणि तिकडे एक बार होता, तिथे जाऊन बसलो, असा किस्सा राज ठाकरे यांनी यावेळी सांगितला.
हेही वाचा – Raj Thackeray : सत्तेचा बोळा तोंडात कोंबला असता तर…; राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा
राज ठाकरे म्हणाले की, बारमध्ये बसलो होतो तेव्हा माझं सहज वरती लक्ष गेलं. तिथे मोठ्या पाटीवर लिहिलं होतं, मुस्लिमांना परवानगी नाही. मलेशिया एक मुस्लिम देश आहे, म्हणून मी त्यांना विचारलं की हे कशासाठी लिहिलं आहे? त्यांनी मला सांगितलं की मुस्लिम धर्मात दारु पिणे चुकीचे मानतात आणि जुगारही मान्य नाही. त्यामुळे मी त्यांना विचारले की, तुम्हाला कसं कळतं की, माणूस मुस्लिम आहे ते? त्यांनी सांगितलं, कायद्याने फक्त पाटी लावली आहे. बाकी आम्ही कोणाला थांबवत नाही. स्वत:च्या देशाची प्रगती करण्यासाठी जर एक देश धर्माला बाजूला करत असेल तर आपण कोणती संस्कृती घेऊन बसलो आहोत? बाजूचा गोवा पाहा. अख्ख जग तिथं जातं. गोव्यासारख्या बीचवरती जे दिसते ते चित्र जर कोकणात दिसलं तर आमची संस्कृती खराब होते, असे म्हणतात. इकडंची संस्कृीत खराब होते तर गोवा आणि केरळची संस्कृती वाईट आहे का? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
हेही वाचा – Politics : शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना काढलं खोलीच्या बाहेर? व्हिडीओ होतोय व्हायरल
Edited By – Rohit Patil