Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रकोकणMaharashtra Election 2024 : सिंधुदुर्गातील तीन मतदारसंघांत 17 उमेदवार; 6,78,928 मतदारांचा कौल...

Maharashtra Election 2024 : सिंधुदुर्गातील तीन मतदारसंघांत 17 उमेदवार; 6,78,928 मतदारांचा कौल महत्त्वाचा

Subscribe

कणकवली मतदारसंघात 2 लाख 31 हजार 740 मतदार असून कुडाळ मतदारसंघात 2 लाख 17 हजार 186 मतदार आहेत. तर, सावंतवाडी मतदारसंघात 2 लाख 30 हजार दोन मतदार आहेत एकूण मतदारांपैकी दिव्यांग आणि 85 वर्षांवरील 2 हजार 273 नागरिकांनी मतदान केले आहे.

(Maharashtra Election 2024) सिंधुदुर्ग : महाराष्ट्र विधानसभेसाठी राज्यात आज, बुधवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघात एकूण 17 उमेदवार रिंगणात आहेत. येथे प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रामुख्याने लढत होणार आहे. शनिवार दिनांक 23 रोजी मतमोजणी होईल. (6.75 lakh voters will decide the fate of 17 candidates in three constituencies in Sindhudurga)

एकूण 921 मतदान केंद्रावर जिल्ह्यातील 6 लाख 78 हजार 928 मतदार तीन जागांवरील 17 उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 1456 पोलिस अधिकारी, 857 होमगार्ड तसेच सीआरपीएफ आणि एसआरपीच्या पाच कंपन्या जिल्ह्यात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, सुमारे साडेपाच हजार निवडणूक कर्मचारी विविध मतदान केंद्रांवर कार्यरत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra polls 2024 : निवडणुकांचे इतके व्यापारीकरण कधीच झाले नव्हते, ठाकरे गटाचा भाजपावर निशाणा

जिल्ह्यातील 6 लाख 78 हजार 928 मतदारापैकी ३ लाख 36 हजार 991 पुरुष मतदार, 3 लाख 41 हजार 934 महिला मतदार आणि तीन तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. कणकवली मतदारसंघात 2 लाख 31 हजार 740 मतदार असून कुडाळ मतदारसंघात 2 लाख 17 हजार 186 मतदार आहेत. तर, सावंतवाडी मतदारसंघात 2 लाख 30 हजार दोन मतदार आहेत एकूण मतदारांपैकी दिव्यांग आणि 85 वर्षांवरील 2 हजार 273 नागरिकांनी मतदान केले आहे, त्यामुळे उर्वरित 6 लाख 76 हजार 655 नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. मतदान करताना निवडणूक ओळखपत्रासह 12 प्रकारची अन्य ओळखपत्रे दाखविल्यास मतदान करता येणार आहे.

- Advertisement -

तिन्ही मतदारसंघांमध्ये चुरस

जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक चुरशीची होणार असून एकूण 17 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये कणकवली मतदारसंघात सहा उमेदवार रिंगणात असून महायुतीतील भाजपाकडून आमदार नितेश राणे विरुद्ध महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदेश पारकर यांच्यात लढत होत आहे. याशिवाय, बहुजन समाज पक्षाचे चंद्रकांत जाधव, अपक्ष उमेदवार गणेश माने, बंदेनवाज खानी, संदेश परकर असे सहा उमेदवार रिंगणात आहेत. कुडाळ मतदारसंघात पाच उमेदवार निवडणूक रिंगणात असून महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक विरुद्ध महायुतीतील शिवसेनेकडून माजी खासदार निलेश राणे लढत होत आहे. तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून अंनतराज पाटकर, बहुजन समाजवादी पक्षाकडून रवींद्र कसालकर आणि अपक्ष उमेदवार उज्वला येवाळीकर हेही रिंगणात आहेत.

सावंतवाडी मतदारसंघात सहा उमेदवार निवडणूक रिंगणात असून महायुतीकडून शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर विरुद्ध महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे राजन तेली, तसेच अपक्ष उमेदवार विशाल परब, अर्चना घारे, सुनील पेडणेकर, दत्ताराम गावकर हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. (Maharashtra Election 2024: 6.75 lakh voters will decide the fate of 17 candidates in three constituencies in Sindhudurga)

हेही वाचा – Sharad Pawar : विनोद तावडेंच्या झालेल्या कथित आरोपावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले


Edited by Manoj S. Joshi

Maharashtra Election 2024 : सिंधुदुर्गातील तीन मतदारसंघांत 17 उमेदवार; 6,78,928 मतदारांचा कौल महत्त्वाचा
Tejaswi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejaswi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -