Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रकोकणMaharashtra Election Results 2024 : मतदारांसाठी रक्ताचे पाणी करेन, निलेश राणेंचे आश्वासन

Maharashtra Election Results 2024 : मतदारांसाठी रक्ताचे पाणी करेन, निलेश राणेंचे आश्वासन

Subscribe

निलेश राणे यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी संत राऊळ महाराज महाविद्यालय चौकापासून भाजपा कार्यालयापर्यंत रॅली काढली. यामध्ये जयघोष करीत डीजेच्या तालावर गुलालाची उधळण करण्यात आली.

(Maharashtra Election Results 2024) मुंबई : मतदारसंघाची सेवा करताना मी जीवाचे रान करेन आणि रक्ताचे पाणी करेन, असे आश्वासन कुडाळ मालवणमधील महायुतीचे नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांनी दिले. तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे भावनिक उद्गारही त्यांनी काढले. (Nilesh Rane’s emotional speech)

कुडाळ मतदारसंघात पाच उमेदवार निवडणूक रिंगणात होते. प्रामुख्याने महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक विरुद्ध महायुतीतील शिवसेनेकडून माजी खासदार निलेश राणे अशी लढत होती. तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून अंनतराज पाटकर, बहुजन समाजवादी पक्षाकडून रवींद्र कसालकर आणि अपक्ष उमेदवार उज्वला येवाळीकर हेही रिंगणात होते.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : शिंदे गटासाठी मनसे ठरली डोकेदुखी! ठाकरे गटालाही फटका

या चुरशीच्या निवडणुकीत निलेश राणे यांनी 8 हजार 176 मतांनी विजयी मिळविला. त्यांना 81 हजार 659 मते मिळाली. तर, वैभव नाईक यांना 73 हजार 483 मते मिळाली. मतमोजणीत आपण पिछाडीवर असल्याचे लक्षात येताच पाच फेऱ्या बाकी असतानाच वैभव नाईक यांनी मतमोजणी केंद्रातून बाहेर पडणे पसंत केले. मतदारांनी दिलेला कौल आपल्याला मान्य आहे. सर्व मतदारांचे आणि पत्रकारांचे आभार मानत ते तिथून निघून गेले. तसेच, त्यांनी विजयी उमेदवार निलेश राणे यांना शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

निलेश राणे यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी संत राऊळ महाराज महाविद्यालय चौकापासून भाजपा कार्यालयापर्यंत रॅली काढली. यामध्ये जयघोष करीत डीजेच्या तालावर गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला ज्या पद्धतीने आपण शांततेने ही निवडणूक लढवली, अशी शांतता पुढील काळात ठेवूया. मतदारांनी आपल्यावर जो विश्वास दाखविला आहे तो सार्थ ठरवू, जनसेवा मानून काम करूया. जी वचने निवडणूक काळामध्ये दिली आहे, ती पूर्ण करण्यासाठी काम करूया. या मतदारसंघातील जनतेची सेवा करण्यासाठी मी जीवाचे रान आणि रक्ताचे पाणी करेन. ही जनता सुखी व्हावी, समृद्ध व्हावी हे माझे उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (Maharashtra Election Results 2024 : Nilesh Rane’s emotional speech)

हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : निकाल स्वीकार करण्यासारखा नाही, ठाकरे गटाची तीव्र नाराजी


Edited by Manoj S. Joshi

Maharashtra Election Results 2024 : मतदारांसाठी रक्ताचे पाणी करेन, निलेश राणेंचे आश्वासन
Tejaswi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejaswi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -