घरठाणेठाण्यातील कोपरी बंगला येथील रस्ता खचला, रस्त्यावरील वाहतूक बंद

ठाण्यातील कोपरी बंगला येथील रस्ता खचला, रस्त्यावरील वाहतूक बंद

Subscribe

कोपरी बारा बंगला येथील मुख्य वनरक्षक कार्यालय येथे भूमिगत मलनिःसारण व पाण्याच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम सुरु असताना तेथील रस्त्याचा काही भाग खचल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास समोर आली. तर या रस्त्यावरील वाहतुक पुढील दोन दिवस मलनिःसारण व पाण्याच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम होईपर्यंत पुर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती आपत्ती विभागाचे अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.

कोपरी पूर्व येथे भूमिगत मलनिःसारण व पाण्याच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम सुरु होते. त्यावेळी अचानक तेथील रस्त्याचा काही भाग खचल्याचे निर्दशनास आले. याची माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यस्थापन, कोपरी वाहतूक पोलीस कर्मचारी, ठामपा मलनिःसारण आणि पाणीपुरवठा विभागाने घटनास्थळी धाव घेत तातडीने त्या रस्त्यावरील वाहतुक बंद केली.

- Advertisement -

यामध्ये कोणालाही दुखापत झाले नसून त्या रस्त्या वाहतूक शाखेच्या परवानगीने पुढील दोन दिवस मलनिःसारण व पाण्याच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम होईपर्यंत वाहतुकीकरीता पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सावंत यांनी दिली.


हेही वाचा : अमेरिकेची अभिनेत्री केके व्याट देणार ११ व्या मुलाला जन्म

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -