Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र कोरेगाव भीमा प्रकरण: आनंद तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज NIA न्यायालयाने फेटाळला

कोरेगाव भीमा प्रकरण: आनंद तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज NIA न्यायालयाने फेटाळला

Related Story

- Advertisement -

माओवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप असणारे आणि कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना NIA च्या न्यायालयाने झटका दिला आहे. आनंद तेलतुंबडे यांनी जामीनासाठी NIA च्या विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा जामीन अर्ज सोमवारी फेटाळून लावला.

आनंद तेलतुंबडे यांनी जामीन अर्जात जातीयवादी शक्तींकडून मला या प्रकरणात जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आल्याचा दावा केला होता. एनआयएने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आणि आरोपपत्रात माझ्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे नाहीत. जातीयवादी शक्तींकडून मला या प्रकरणात जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आलं आहे, असं आनंद तेलतुंबडे यांनी जामीन अर्जात म्हटलं होतं. मात्र, हा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी NIA ने युक्तीवाद केला. आरोपी तेलतुंबडे हे माओवाद्यांशी संबंधित प्रतिबंधित संघटनेचे सक्रिय सदस्य होते. या संघटनेने हिंसाचाराला चिथावणी दिली. या संघटनेशी संबंधित कबीर कला मंचने पुण्यात आयोजित केलेल्या एल्गार परिषदेलाही ते उपस्थित होते, असा NIA तर्फे विशेष सरकारी वकील प्रकाश शेट्टी यांनी दावा केला.

फादर स्टॅन स्वामी यांचं निधन

- Advertisement -

मानवाधिकार कार्यकर्ते आणि कोरेगाव भीमा हिंसा प्रकरणी अटकेत असलेले फादर स्टॅन स्वामी यांचं ५ जुलै रोजी निधन झालं. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. स्वामींवर ते नक्षली चळवळीशी संबंधित असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसंच भीमा कोरेगाव प्रकरणी हिंसाचार भडकवल्याच्या आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

 

- Advertisement -

 

- Advertisement -