घरताज्या घडामोडीKoregaon Bhima Probe: शरद पवार भीमा कोरेगाव प्रकरणी साक्ष देण्यासाठी २३ फेब्रुवारीला...

Koregaon Bhima Probe: शरद पवार भीमा कोरेगाव प्रकरणी साक्ष देण्यासाठी २३ फेब्रुवारीला आयोगासमोर राहणार उपस्थित

Subscribe

कोरेगाव भीमा हिंसाचार (Koregaon Bhima Case) प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. याच आयोगाने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना (Sharad Pawar) साक्ष देण्यासाठी समन्स पाठवला आहे. याप्रकरणात शरद पवार २३ आणि २४ फेब्रुवारीला आयोगासमोर हजर होऊन साक्ष नोंदवणार आहेत. यापूर्वी आयोगाने शरद पवार यांनी २०२०मध्ये समन्स पाठवला आहे. परंतु कोरोना आणि लॉकडाऊमुळे शरद पवार आयोगासमोर हजर होऊ शकले नव्हते.

- Advertisement -

दरम्यान शरद पवार यांच्याशिवाय आयोगाने तत्कालीन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पखाले आणि पुण्याचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र सेंगांवकर यांचे जबाब नोंदवणार आहे. त्यासाठी २१ ते २५ फेब्रुवारी ही वेळ आयोगाने निश्चित केली आहे. याबाबतची माहिती न्यायिक आयोगाचे अधिवक्ता आशिष सातपुते यांनी बुधवारी दिली.

दोन सदस्यीय चौकशी आयोगात कोलकाता उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जेएन पटेल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांचा समावेश आहे. त्याद्वारे या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

- Advertisement -

नेमके प्रकरण काय आहे?

मराठा सेना आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या युद्धाच्या २०० व्या स्मृतिदिनानिमित्त ३१ डिसेंबर २०१७ रोजी भीमा कोरेगांव शौर्य दिवस प्रेरणा अभियान’ या कार्यक्रमाअंतर्गत अनेक दलित संघटनांनी एकत्रितपणे एका रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी बहुतांश दलित सैनिक होते. पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी दंगल झाली होती आणि त्या दिवशी इथे लाखोंच्या संख्येने दलित समुदाय जमा होतो. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात झालेल्या ‘एल्गार परिषदे’तील वक्तव्यं कारणीभूत होते अशा तक्रारीवरून पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला.

या ‘एल्गार परिषदे’च्यामागे माओवादी संघटनांचा हात होता, असे म्हणत या संघटनांशी कथित संबंध आहेत, या संशयावरून पुणे पोलिसांनी देशभरातल्या विविध भागांतून डाव्या चळवळीशी संबंधित अनेकांना अटक केली. २८ ऑगस्ट रोजी पुणे पोलिसांनी गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वरवरा राव, अरुण फरेरा आणि वरनॉन गोन्सालविस यांना अटक केली होती.


हेही वाचा – Nitesh Rane : नितेश राणेंना अखेर जामीन मंजूर, सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाचा निर्णय


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -