घरमहाराष्ट्रभीमा कोरेगाव प्रकरणाला नवे वळण, हॅकरनेच प्लांट केले 'ते' पुरावे

भीमा कोरेगाव प्रकरणाला नवे वळण, हॅकरनेच प्लांट केले ‘ते’ पुरावे

Subscribe

काय म्हटले आहे अर्सेनलच्या अहवालात

भीमा कोरेगाव प्रकरणाला आता नवे वळण आले आहे. अमेरिकन कंपनीने दिलेल्या अहवालामुळे या प्रकरणात वेगळाच ट्विस्ट आला आहे. कोरेगाव भीमा दंगल आणि स्फोटक प्रकरणात काही पुराव्याच्या आधारार अनेक कार्यकर्ते आणि समाजिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. परंतु हे पुरावे एका हॅकरनेच ठेवले असल्याचे या अहवालात समोर आले आहे. एका दस्तावेजाच्या आधारावर पकडण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्याचा लॅपटॉपची अमेरिकन कंपनीने चौकशी केली. या कंपनीने दिलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, आरोपीच्या लॅपटॉपवर हॅकरने ताबा मिळवला होता. तसेच याच हॅकरने ते दस्तावेज पुरवले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ज्या डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यातील एका विरोधात ही दस्तावेज प्लांट केली असल्याचे समजते आहे.

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात २०१८ साली रोना विल्सन,सुधा भारद्वाज,गौतम नवलखा यांच्यासह १४ पेक्षा अधिक लोकांना UAPA अंतर्गत अटक करण्यात आली आहे. यातील रोना विल्सन विरोधात हॅकर्सने पुरावे पेरले असल्याचे अमेरिकेची कंपनी अर्सेनलने म्हटले आहे. रोना विल्सन यांच्या लॅपटॉपर हॅकरने काही घटनेच्या काही काळाअधीच ताबा मिळवला असल्याचे अर्सेनलने म्हटले आहे.

- Advertisement -

विल्सन यांच्या लॅपटॉपमध्ये घातक सॉफ्टवेअर असल्याचा आणि कोरेगाव-भीमा या प्रकरणाबाबत पत्र होते. तसेच मोदींना संपवण्याचा कटही असल्याचा या पत्रात उल्लेक केला होता. तसेच पुरेशी कागदपत्र आणि तोंडी पुराव्यानुसार या सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

कोरेगाव भीमा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या प्रवक्त्या डॉ.जया रॉय यांनी या प्रकरणावर आपले मत दिले आहे की, विल्सन यांच्या लॅपटॉपचा फॉरेन्सिक तपास केला तेव्हा असा कोणत्याही प्रकारचा घातक सॉफ्टवेअर आढळला नाही.

- Advertisement -

काय म्हटले आहे अर्सेनलने

अमेरिकेची कंपनी अर्सेनलने म्हटले आहे की, रोना विल्सन यांच्या लॅपटॉपवर हॅकरने २२ अटकेच्या २२ महिन्यांपूर्वीच ताबा मिळवला आहे. या हॅकरने रोना यांच्यावर सुरुवातीला पाळत ठेवली होती. यादरम्यान हॅकरने त्यांच्या लॅपटॉपमध्ये काही पत्रके ठेवली. ही कागदपत्रे छुप्या पद्धतीने ठेवण्यात आले असल्याने रोना यांच्या बघण्यात आली नाहीत. परंतु रोना विल्सन यांच्या लॅपटॉपवर कोणी पाळत ठेवली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -