Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी सांगलीला ALERT ! बोटीने स्थलांतरासाठीचे पॅनिक बटण दाबू नका - जिल्हाधिकारी

सांगलीला ALERT ! बोटीने स्थलांतरासाठीचे पॅनिक बटण दाबू नका – जिल्हाधिकारी

Related Story

- Advertisement -

कोयना धरण क्षेत्रात पाण्याची पातळी वाढत असल्याने सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी नागरिकांना वेळीच स्थलांतराचे आवाहन केले आहे. आज शुक्रवारी सायंकाळपर्यंत पाण्याची पातळी ही आणखी १० ते १२ फुटांनी वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच नागरिकांनी वेळीच स्थलांतरीत व्हावे. तसेच सध्या आपल्याकडे वेळ असल्याने स्थलांतरण हे पायीच करणे शक्य आहे. त्यानंतर मात्र बोटीने स्थलांतरीत व्हायची वेळ येणार नाही याची दक्षता नागरिकांनी घेणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले. आगाऊ माहिती मिळाल्यानेच कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ही तातडीची घोषणा करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

सध्या ५० फूट ते ५२ फूट इतक्या उंचीच्या आत ज्यांची घरे आहेत, अशा नागरिकांचे स्थलांतरण करणे गरजेचे आहे. या नागरिकांच्या स्थलांतरणाची व्यवस्थित काळजी घेतील जाईल असेही ते म्हणाले. तसेच स्थलांतर करणाऱ्या नागरिकांचे व्यवस्थित स्थलांतरण करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक होऊन मदतीची वाट पाहण्यापेक्षा नागरिकांनी वेळेत स्थलांतरण करावे असेही आवाहन त्यांनी केला. आता आगाऊ सूचना मिळाल्याने स्थलांतरण करण्यासाठी वेळ आहे. पण त्यानंतर बोटींगने रेस्क्यू करण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणूनच वेळेत शिफ्टिंग करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांनाही सामानाच्या शिफ्टिंग करण्यासाठी मुभा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सर्वत्र प्रशासनाच्या टीमचे लोक मदतीला आले आहेत. शहरी भागात महापालिका आयुक्त, महापौर मदतीला आले असल्याचे त्यांनी सांगितले.

सांगलीला एनडीआरएफचीही मदत मिळाली आहे. सध्या एनडीआरएफची टीम ही आष्टा आणि वाळवा शिरगाव येथे कामाला लागली आहे. तर आणखी एक टीम ही रात्री किंवा उद्या शनिवारी सकाळी पोहचेल अशीही माहिती त्यांनी दिली.
पण या सगळ्या परिस्थितीमध्ये नागरिकांचे स्थलांतरण करण्याची बोटीमार्फतची वेळ येऊ नये महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यासाठीच नागरिकांना आता वेळ असतानाच पायी स्थलांतरण करणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

सांगली जिल्ह्यात दुपारपर्यंत 25 रस्ते पाण्याखाली

- Advertisement -

जिल्ह्यात व पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे व धरणांमधून करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असून आज दिनांक 23 जुलै पर्यंत शिराळा, वाळवा, पलूस, मिरज व खानापूर या तालुक्यांमधील 25 रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये राज् महामार्ग 8 व प्रमुख जिल्हा मार्ग 17 अशा 25 रस्त्यांचा समावेश आहे.
पावसामुळे,पूरामुळे,घाट भागात व इतर तत्सम कारणांमुळे (उदा. पूल बुडीत होणे, पूलाचा भराव खचणे इ.) वाहतुक खंडित/बंद पडलेल्या रस्त्याचा तपशील पुढीलप्रमाणे

शिराळा तालुका – वाकुर्डे बुद्रुक शिराळा कांदे मांगले सागांव ठाणापुडे राज्यमार्ग 159 वरील कांदे मांगले दरम्यान मांगले पुल, रामा.क्र.191 पासून नांदगाव पिशवी बांबवडे सरुड सागांव मांगरुळ रस्ता रामा.क्र. 397, शिराळा फकीरवाडी मांगले काखे रस्ता प्रजिमा 7 काखे – मांगले पूल, शिराळा तालुक्यातील इग्रुळ भाटशिरगांव कांदे सांवर्डे प्रजिमा 6 कांदे पुल जोड रस्ता, आरळा शित्तुर प्रजिमा क्र.113 आरळा पुल, करमाळा शिराळा शिंगटेवाडी मांगले प्रजिमा क्र.8 शिंगटेवाडी पुल यांचा समावेश आहे.

वाळवा तालुका – वाकुर्डे बुद्रुक शिराळा कांदे मांगले सागांव ठाणापुडे राज्यमार्ग 159 कि.मी.46/300 लहान पुलाचे जोडरस्ते पाण्याखाली, राज्यमार्ग 159 कि.मी.52/500 मधील येलूर गावाजवळील फरशी पुल, रामा क्र.150 ताकारी पुल, ऐतवडे खुर्द कुंडलवाडी तांदुळवाडी रस्ता प्रजिमा क्र.10 वरील निलेवाडी गावाजवळ ऐतवडे पुल, रस्ता प्रजिमा क्र.10 वरील तांदुळवाडी गावाजवळ, वाळवा पडवळवाडी बावची नागांव ढवळी शिगांव रस्ता प्रजिमा – 11 शिगाव गावाजवळ, शिरगांव अहिरवाडी रस्ता प्रजिमा – 117 आहिरवाडी गावाजवळ

पलूस तालुका – देवराष्ट्रे कुंडल किर्लोस्करवाडी बुर्ली आमणापूर अंकलखोप नागठाणे वाळवा बोरगांव रस्ता रा मा 158 वरील आमणापूर पुल, रा मा 158 वरील बुर्ली आमणापूर ओढा, उरण इस्लामपूर जुनेखेड नवेखेड प्रजिमा 36 वरील पुणदी पुल, आमणापूर येळावी तासगांव रस्ता प्रजिमा क्रं.91, प्रजिमा 96 वरील नागठाणे गावाजवळील मौल्याचा ओढा, नागराळे ते शिरगाव फा्टा प्रजिमा 32, बम्हनाळ ते भिलवडी प्रजिमा क्रं.121,
मिरज तालुका – खंडाळा पळशी कराड सांगली रा. मा. क्रं. 142, अंकली जुनी धामणी बामणी कृष्णाघाट ढवळी म्हैसाळ रस्ता प्रजिमा क्रं. 44 वरील स्वामी नाल्यावरील पुल, माधवनगर पदमाळे मौजे डिग्रज ब्रम्हनाळ प्रजिमा क्रं 42, मौजे डिग्रज नावरसवाडी खोतवाडी नांद्रे प्रजिमा 123

खानापूर तालुका – कमलापूर रामापूर रस्ता प्रजिमा क्र.77 मधील येरळा नदीवरील फरशी पूल.


 

- Advertisement -