घरताज्या घडामोडीमराठी माणुस म्हणून मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय, क्रांति रेडकरचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मराठी माणुस म्हणून मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय, क्रांति रेडकरचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Subscribe

तुम्ही कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही ह्याची मला खात्री आहे

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय आयुक्त यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी लग्न आणि धर्माच्या मुद्द्यावरून आरोप करणारे ट्विट शेअर केले. या सगळ्या प्रकरणात समीर वानखेडे तसेच त्यांच्या कुटूंबीयांनीही स्पष्टीकरण दिले आहे. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांति रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. खाजगी आयुष्यावर झालेल्या आरोपांमुळे क्रांति रेडकरने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास काही गोष्ट आणून दिल्या आहेत. मुख्यमंत्री माझ्या कुटूंबावर अन्याय होऊ देणार नाही, अशी खात्रीही व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांकडे अपेक्षेने पाहत असून मुख्यमंत्र्यांनी योग न्याय करावा असेही क्रांतिने आपल्या पत्रात लिहिले आहे. क्रांति रेडकरने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितानाच मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळही मागितली आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना फोन करून क्रांतिने वेळ मागितली आहे.

काय म्हटले आहे पत्रात ?

माननीय उद्धव ठाकरे साहेब, लहानपणा पासून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा आदर्श घेऊनच मी वाढले.. कुणावर अन्याय करु नये आणि आपल्यावर होणार अन्याय सहन तर मुळीच करू नये हे दोघांनी शिकवलं.. तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खाजगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे.. लढते आहे.. सोशल मिडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघतायत..

- Advertisement -

kranti redkar letter

तुम्ही माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार ह्याची खात्री

मी एक कलाकार आहे… राजनीती मला कळत नाही.. आणि मला यात पडायचं सुद्धा नाही.. आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लख्तरं चार चौघात उधळली जातात.. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे.. विनोद करून ठेवला आहे.. आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं.. एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी हल्ले हे राजकारणाच किती नीच स्वरूप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्यापर्यंत पोहचल आहे… आज ते नाही पण तुम्ही आहात.. त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो.. तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.. तुम्ही कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही ह्याची मला खात्री आहे.. म्हणून एक मराठी माणुस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय.. तुम्ही योग्य तो न्याय करा ही विनंती.

- Advertisement -

हेही वाचा Sameer Wankhede : वानखेडे कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या येताहेत, क्रांती रेडकरचा खुलासा

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -