घर ताज्या घडामोडी कसब्यात भाजपमध्ये मतभेद, चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' विधानावर टिळकांची नाराजी

कसब्यात भाजपमध्ये मतभेद, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर टिळकांची नाराजी

Subscribe

मागील महिन्यात पुण्यात पोटनिवडणूक पार पडली. मात्र, या पोटनिवडणुकीत भाजपला आपल्या बालेकिल्ल्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. कसबा पेठच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव झाल्यामुळे त्याचे पडसाद आता भाजपमध्ये उमटायला सुरुवात झाली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टिळकांविषयी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून मुक्ता टिळक यांचे पुत्र आणि भाजपचे पदाधिकारी कुणाल टिळक यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

मुक्ता टिळक यांच्या पुण्यातील कामाला दुर्लक्षित करणं बरोबर नसल्याचं कुणाल टिळक यांनी म्हटलं आहे. गेल्या 50 वर्षांत टिळक कुटुंबानं पुण्यात जे काम केलं, ते मतदार 2 महिन्यात कसं विसरणार?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. येत्या निवडणुकीत होणारे बदल दिसतील, असं सूचक वक्तव्यही कुणाल टिळक यांनी केलं आहे.

- Advertisement -

चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य काय?

मुक्ता टिळक यांच्या आजारपणामुळे टिळक कुटुंबाचा मतदारांशी राजकीय संपर्क तुटला होता. त्यामुळेच कसबा पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबाबाहेर भाजपने उमेदवारी दिली, असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटलांनी केलेल्या या वक्तव्यावर मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपची पुढील भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा : सावरकर अवमानप्रकरणी राहुल गांधींनी माफी मागावी, उद्योगमंत्री उदय सामंत यांची मागणी


 

- Advertisment -