Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी आपत्ती नियंत्रण कक्षाचा पदभार कुर्‍हाडे यांच्याकडे

आपत्ती नियंत्रण कक्षाचा पदभार कुर्‍हाडे यांच्याकडे

Related Story

- Advertisement -

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी प्रशांत वाघमारे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची जबाबदारी नागरी संरक्षण दलाचे सहायक उपनियंत्रक अर्जुन कुर्‍हाडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
जिल्हयात पाऊस सुरू असल्याने आणि ब्रम्हगिरीवर दरड कोसळण्याची घटना घडलेली असतांना आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख प्रशांत वाघमारे हे गैरहजर असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना नोटीस बजावली होती. मात्र कामाचा अतिरिक्त ताण वाढल्याने तब्येतीवर होणार्‍या परिणामामुळे नोटीसीपूर्वीच आपण राजीनामा दिल्याचे वाघमारे यांनी सांगितले. मात्र पावसाळा सुरू असल्याने धरणांतूनही विसर्ग करण्यात यावा लागू शकतो त्यामुळे या विभागाची जबाबदारी नागरी संरक्षण दलाचे सहा. उपनियंत्रक अर्जून कुरहाडे यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपविण्यात आला आहे. कंत्राटी पध्दतीचे हे पद असल्याने पद भरण्याबाबतची कार्यवाही लवकरच केली जाईल असेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisement -