घरताज्या घडामोडीकामगार नेते अॅड. सुखदेव काशिद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

कामगार नेते अॅड. सुखदेव काशिद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Subscribe

दिवंगत कामगार नेते शरद राव यांच्यानंतर म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबई आणि म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळणारे अॅड. सुखदेव काशिद (61) यांचे गुरूवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुलुंड येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.

दिवंगत कामगार नेते शरद राव यांच्यानंतर म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबई आणि म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळणारे अॅड. सुखदेव काशिद (61) यांचे गुरूवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुलुंड येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या दुर्दैवी निधनाने कामगार जगताला मोठा धक्का बसला आहे. (Labor leader Adv Sukhdev Kashid passed away due to heart attack)

पालिकेतील कामगारांमध्ये शोककळा पसरली असून एका चांगल्या व कर्तबगार कामगार नेत्याला मुकल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व नात असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी 10 वाजता मुलुंड (पूर्व), टाटा कॉलनी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

म्युनिसिपल मजदूर युनियनमध्ये दिवंगत कामगार नेते शरद राव यांच्यासोबत अॅड. सुखदेव काशिद (जिल्हा पुणे, तालुका मांढरगाव) यांनी खांद्याला खांदा देऊन कामगारांवरील अन्यायाविरोधात गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेत, बेस्ट उपक्रमात आणि प्रसंगी न्यायालयात कायदेशीर लढा दिला. त्यांना मागील काही वर्षांपासून किडनीचा त्रास जाणवत होता. मात्र त्याही परिस्थितीत त्यांनी कामगारांसाठी आपला लढा सुरूच ठेवला होता. किडनी आजारामुळे त्यांना आठवड्यातून तीनदा डायलसीसचे उपचार घ्यावे लागत होते. कामगार म्हणजे त्यांचा जीव की प्राण.

या कामगारांसाठी त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले. कामगारांसाठी लढा देताना त्यांचे आपल्या प्रकृतीकडे थोडेसे दुर्लक्ष झाले आणि नेमके नियतीने डाव साधला. तसेच, कामगारांसाठी लढा देताना घरची जबाबदारी सांभाळत त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली आहे. त्यांच्या निधनाने कामगार जगतात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबादेवी परिसरात बॅनर लावण्यावरून मनसे कार्यकर्त्यांची महिलेला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -