मुंबई : सध्याच्या कामगार मंत्र्यांची भूमिका ही माथाडी कामगारांच्या हिताच्या विरोधात असून कामगार चळवळींच्या विरोधात आहेत, अशी टीका माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी डॉ.सुरेश खाडे यांच्यावर केली आहे. नवी मुंबईमध्ये आण्णासाहेब पाटील यांची 90 वी जयंती उद्या साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री हजेरी लावणार आहेत. यावेळई 18 माथाडी कामगारांना ‘माथाडी कामगार पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.
नरेंद्र पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये माथाडी कामगार नेत्यांवर अनेक आरोप केले आहे. यावेळी नरेंद्र पाटील म्हणाले, “सध्याचे कामगार मंत्री हे माथाडी कामगारांच्या हिताच्या विरोधात असून कामगार चळवळींच्या विरोधात आहेत. कामगार कायदा हा मूळ महाराष्ट्राचा आहे. या कायद्याला बळ देण्याची आवश्यकता असताना त्यात बदल केला जात आहे. यात माथाडी कामगारांच्या अॅडव्हायजरी बंद करण्यात येतील आणि कारखान्यातील माथाडी कामगारांसाठी कायदा लागू केला जाणार नाही, अशी तरदूत करण्यात आली आहे. यात कामगारांची वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे. मग 60 वर्षांनंतर कामगारांना तुम्ही पेन्शन देणार का?, मग कामगारांनी कसे जगायचे हे तुम्ही ठरवाणा का?, यामुळे कामगार मंत्र्यांची भूमिका ही कामगारांच्या विरोधात आहे. यासंदर्भात कामगार मंत्र्यांशी चर्चा करून कायदा चांगला करणार आणि वाईट गोष्टी बाहेर काढणार आहे, असे नरेंद्र पाटील म्हणाले.
हेही वाचा – प्रश्न विचारू नका, फक्त…; ‘त्या’ फोटोवर अजित पवारांची प्रतिक्रिया
सरकारच्या चुकीच्या गोष्टींना विरोध करणार
राज्य सरकारच्या चुकीच्या गोष्टींचा विरोध करणार आहे, असेही नरेंद्र पाटील यांनी सांगतले. पुढे रनेंद्र पाटील म्हणाले, “बाळ जोपर्यंत रडत नाही. तोपर्यंत आई दूध पाजत नाही. त्याचप्रमाणे हे सगळे आहे. त्यामुळे आमचा कामगार कायद्याला विरोध केला आहे. सत्तेत आलो म्हणून सरकारच्या चुकीच्या गोष्टीला विरोध करायचा नाही आणि सत्तेबाहेर आल्यानंतर विरोध करायचा ही माझी सवय नाही”, असे ते म्हणाले.