घरताज्या घडामोडीधार्मिक तणाव निर्माण करण्याच्या फॅक्टरीची प्रयोगशाळा महाराष्ट्रात; राऊतांचा राज्य सरकारला टोला

धार्मिक तणाव निर्माण करण्याच्या फॅक्टरीची प्रयोगशाळा महाराष्ट्रात; राऊतांचा राज्य सरकारला टोला

Subscribe

'सरकारने देशभरात धार्मिक तणाव निर्माण करण्याची फॅक्टरी उघडली आहे. त्या फॅक्टरीची प्रयोग शाळा महाराष्ट्रात सुरू केली, असे वाटतेय', अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

‘सरकारने देशभरात धार्मिक तणाव निर्माण करण्याची फॅक्टरी उघडली आहे. त्या फॅक्टरीची प्रयोगशाळा महाराष्ट्रात सुरू केली, असे वाटतेय’, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. राज्यातील अनेक भागांत मागील काही महिन्यांपासून दंगली घडत आहेत. नुकताच अकोला आणि नगरमधील शेवगाव शहरात दोन गटात दंगली झाल्या. याप्रकरणी अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. (laboratory in Maharashtra and Factory in india to create religious tensions sanjay Raut slams state government VVP96)

नेमके काय म्हणाले संजय राऊत?

- Advertisement -

“या दंगलींच्या पार्श्वभूमीवर मला भीती वाटते की, महाराष्ट्रातील सध्याचे सरकार आणि त्यांची स्थापन झालेली अनैतिक आघाडीला भविष्यात लोक आम्हाला स्वीकारतील की नाही? याची भीती वाटतेय. त्यामुळे त्यांनी देशभरात धार्मिक तणाव निर्माण करण्याची फॅक्टरी उघडली आहे. त्या फॅक्टरीची प्रयोग शाळा महाराष्ट्रात सुरू केली असे मला वाटतेय”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

“कर्नाटकातही तोच प्रकार झाला. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बजरंगबली, हनुमान चालीसा… उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा, महाआरती हे राज्य सर्व म्हणजे राज्य अस्थिर करून निवडणुकांना सामोर जायचे. तणाव निर्माण करायचा आणि त्याच तणावाच्या पार्श्वभूमीवर मत मागायची. हेच सरकार करत असेल. विरोधी पक्ष हे करणार नाहीत. कारण तुम्ही त्यांना तुरुंगात टाकत आहेत”, असेही संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

“उद्धव ठाकरे यांच्या काळात दंगली नाही घडल्या. कमालीची शांतता होती. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन इतर मागासवर्गीय सर्वेचजण गुण्या गोविंदाने नांदत होते”, असे संजय राऊत म्हणाले. शिवाय, कर्नाटकात तुमचे राज्य असतानाही दंगली कशा झाल्या? बिहारमध्येही तुम्ही दंगली घडवल्या. मणिपूरमध्ये तुमचे राज्य असतानाही का पेटले आहे? असे सवालही यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केले.


हेही वाचा – महाराष्ट्रात कायद्याचे राज्य स्थापित झाले की नाही? हे सिद्ध होणे अद्याप बाकी – संजय राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -