घरCORONA UPDATECoranavirus : चेंबूरच्या आफ्टर केअर वसतीगृहातील मुलांची अन्नधान्याअभावी गैरसोय

Coranavirus : चेंबूरच्या आफ्टर केअर वसतीगृहातील मुलांची अन्नधान्याअभावी गैरसोय

Subscribe

धारावीमध्ये सध्या मोठ्याप्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यामुळे हा परिसरच एकप्रकारे लॉकडाऊन करण्यात आला आहे.

चेंबूरमधील आफ्टर केअर वसतीगृहातील मुलांची सध्या अन्नधान्याअभावी मोठी गैरसोय होत आहे. धारावीमध्ये सध्या मोठ्याप्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यामुळे हा परिसरच एकप्रकारे लॉकडाऊन करण्यात आला आहे. परिणामी याठिकाणाहून जाणारे धान्य सध्या या वसतीगृहात पोहोचले जात नाही. त्यामुळे धारावी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या मतदार संघ असून या विभागातून धान्याचा ट्रक बाहेर वसतीगृहातील मुलांच्या जेवणाचा प्रश्न सोडवावा असे त्यांच्यासह सरकारलाही वाटत नाही.

मुंबईतील अनाथ, हरवलेल्या मुलांसह अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांना चिल्ड्रेन होम अर्थात बाल सुधार गृहात पाठवले जाते. परंतु १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तेथील मुलांना चेंबूर येथील आफ्टर केअर वसतीगृहात पाठवले जाते. या वसतीगृहात या मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.  तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर त्यांना बाहेरचे जग दाखवले जाते. महाराष्ट्र राज्य परिविक्षा आणि अनुरक्षण संचालित आफ्टर केअर वसतीगृह हे महिला व बाल कल्याण खात्यामार्फत चालवण्यात येते. सध्या  ४० मुले आहेत. परंतु मागील तीन महिन्यांपासून या संस्थेला अनुदान न  मिळाल्याने तसेच त्यांचे रेशनही न आल्याने येथील मुलांची प्रचंड गैरसोय होत आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या एम-पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षा व स्थानिक नगरसेविका आशा मराठे यांनी याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. या वसतीगृहाला धारावीतील कंत्राटदाराच्या माध्यमातून अन्नसाठ्याचा पुरवठा होतो. परंतु धारावीमध्ये कोरोनाचे रुग्ण अधिक आढळून आल्यामुळे या भागातून ट्रक येत नाही . त्यामुळे मुलांवर उपासमारीची वेळ आल्याचे त्यांनी म्हटले आहे. या वसतीगृहातील मुलांना जेवण पुरवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला परवानगी मिळाली नाही.त्यामुळे त्यांना तात्पुरते अन्नधान्य उपलब्ध करून दिले आहे. याबाबतची कल्पना महापौर किशोरी पेडणेकर यांना दिली असून त्यांनीही या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -