घरमहाराष्ट्रऔषधांअभावी जीव जाणं हा कंत्राटी सरकारचा नाकर्तेपणा; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

औषधांअभावी जीव जाणं हा कंत्राटी सरकारचा नाकर्तेपणा; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

Subscribe

 विधान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार बोलत होते. ही दुदैवी घटना ह्रदय पिळवणारी आहे. या रुग्णांसाठी डॉक्टर उपलब्ध असू नयेत, रुग्णांचा जीव औषध उपलब्ध नसल्याने जातो.

मुंबई : नांदेड आणि घाटी येथील शासकीय रुग्णालयामध्ये आतापर्यंतच्या माहीतीनुसार 45 व्यक्तींचा नाहक बळी गेला, त्यात बालकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. नवजात बालकांचा खून करण्याचा आणि त्या हॉस्पिटलला हॉस्पिटल म्हणावं की स्मशानभूमी म्हणावं अशाप्रकारची परिस्थिती राज्यसरकारच्या नाकरतेपणामुळे आली असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. (Lack of medicines is the failure of the contracting government Vadettivar attack on the government)
 विधान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार बोलत होते. ही दुदैवी घटना ह्रदय पिळवणारी आहे. या रुग्णांसाठी डॉक्टर उपलब्ध असू नयेत, रुग्णांचा जीव औषध उपलब्ध नसल्याने जातो. रुग्णांना त्याठिकाणी वेळेवर उपचार होत नाही म्हणून त्यांना जीव गमवावा लागतो. डॉक्टर वेळेवर त्यांचा उपचार करत नाही, अनुभवी डॉक्टर नाही. औषधांचा तूटवडा स्वच्छतेचा अभाव या सगळयागोष्टी जर या मृत्यूस कारणीभूत असतील तर या सरकारन बालकांचा आणि या लोकांचा बळी घेतला आहे. याला रुग्णालय म्हणण्या ऐवजी आता स्मशानभूमी बोलण्याची पाळी आणली असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

वर्षभरात 450 रुग्णांचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं ते म्हणतात आम्ही चौकशी करू, तुम्ही काय चौकशी करणार ठाण्याजवळील कळवा येथे झालेली घटना ताजी आहे. त्याठिकाणी चौकशी करतो सांगितलं तर काय चौकशी केली? कुणावर कार्यवाही झाली? शुक्रवारी अहवाल आला इतक्या लोकांचा जीव जाऊनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. आता तिकडे तज्ज्ञ समिती पाठविलेली आहे. नाहक जबाबदार नसणाऱ्यांचा बळी घेणार, या आरोग्य विभागात चाललय काय? गरिब कामगार मजूर शेतकऱ्यांच्या मुली प्रसुतीसाठी जातात आणि त्यांच्या नवजात बालकांना जीव गमवावा लागतो. नांदेडमध्ये आता 35 जणांचा मृत्यू झालेला आहे. मात्र वर्षभरात साडेचारशे लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्याची नोंद असल्याची माहीती वडेट्टीवार यांनी दिली.

मुश्रीफांनी राजीनामा द्यायला हवा

विरोधकांनी राजकारण करु नये, या आरोग्यमंत्र्यांच्या वक्त्व्यांचा समाचार घेत वडेट्टीवार म्हणाले की, रुग्णालयात मृतांचा सडा पडत आहे. साधी औषधे मिळत नाही, वेळेवर उपचार मिळत नाही हे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीम म्हणतात. मला याची कीव येते मी आरोग्य मंत्र्यांचा कारभाराचा पंचनामा काही दिवसांत तुमच्या पुढे ठेवणार पण विरोधक म्हणून जर वस्तुस्थिती सांगितली तर ते राजकारण ठरत मुश्रीफ इतक्या लवकर भूमीका बदलतील अस वाटल नव्हतं, कारण ते ही विरोधक होते. नैतिक जवाबदारी स्वीकारुन मुश्रीफांनी राजीनामा द्यायला हवा होता. हाफकींनने औषध पूरवठा बंद केल्यानंतर पर्यायी व्यवस्था त्याठीकाणी होणे आवश्यकता होती. पाच-पाच जिल्ह्यांचे पालकमंत्री नेमून ठेवले. मंत्रिमंडळ पुणे होत नाही आणि 4 कोटी रुपयांचे मंजूर होऊन त्या रुग्णालयात औषधे आणि उपकरणे उपलब्ध करुन दिली जात नाहीत. आणि निष्पाप लोकांचा बळी जातो. या नालायक सरकारचा नाकर्तेपणा आहे. आणि आरोग्याचे धिंडवडे निघाले आहेत असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

अधिष्ठातांना निलंबित करा

सरकार पाच पाच कोटी दहा दहा कोटी रुपयांचे टेंडर काढते. यामध्ये 20 टक्के वसूली सुरु आहे. बदली, बदल्या आणि टेंडर या पालिकेडे या त्रिकुटां दुसरे काम शिकवू नये म्हणुन आरोग्यासारख्या गंभीर बाबींकडे यांचे लक्ष आहे. आरोग्यमंत्र्यांची सर्व माहिती आमच्याकडे आहे. काय दिवे लावून ठेवले ते मी महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी उघडे करणार. तर डीन वाकूळे म्हणतात की, खा,गी रुग्णालयातील डॉ. सुट्टयांमुळे बाहेरगावी गेल्यामुळे ती सर्व रुग्ण आमच्याकडे आली आणि ती गंभीर असल्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला अशा पोरकटपणाचा स्टेटमेंट करणाऱ्या डीनला तातडीने सस्पेंट करण्याची आवश्यक्ता होती असे वडेट्टीवार म्हणाले.
चंद्रपूरमध्ये एका महिलेल्या आपल्या पोटातील गोळाचे ऑपरेशन करण्यासाठी 11 दिवस वाट पाहूनही ऑपरेशन झालं नाही बाहेरची औषधे लिहून दिल्यामुळे डॉक्टरवरच हल्ला करण्यात आला. त्या डॉक्टरांनी आंदोलन केलं औषधां अभावी, डॉक्टरां अभावी रुग्णांचा जीव जात असेल तर महाराष्ट्रामध्ये या करंटे सरकारचा नाकर्तेपणा आहे. म्हणून याची जवाबदारी डीन आणि आरोग्य मंत्र्यांवर निश्चित केली आहे.

मृतांचे आकडे खोटे आहेत का?

विरोधक खोट बोलत असल्याचा आरोप सत्ताधारी करत आहे. यावर वडेट्टीवार म्हणाले मृतकांचा आकडा खोटा आहे का? सरकारच्या नाकर्तेपणामुळे रुग्णांचा जीव गेला हे खोटं आहे का? औषधोपचार मिळाले नाही, डॉक्टर वेळेवर पोहचले नाहीत की हे खोटे आहे. या निक्रीय सरकारची खुर्चीवर बसण्याची लायकी नाही आप-आपसात भांडण लावणं, पक्ष फोडणं आणि लुटेऱ्यासारखं लुटणं एवढच सरकारला काम आहे, असेही वडेट्टीवार यांनी हल्लाबोल करताना सांगितलं. अजित पवार  हे राजकीय आजारी असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लागावला.

 चौकशीचा फार्स कशाला 

कळव्यामध्ये 18  लोकांना आपला जीव गमवावा लागला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले, या चौकशीत काय झाले, चौकशी समिती नेमून किती  दिवस झाले, किती लोकांवर कारवाई झाली, कोण दोषी आहे. हे सिद्ध झाल का, असा सवाल करत हा चौकशीचा फार्स कशाला असा प्रश्न वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केला.

तिजोरी लुटीकडे सर्वांचं लक्ष 

या सरकामध्ये कूणाचाही कूणावर नियंत्रण नाही जो तो आपआपल्या मर्जीप्रमाणे वागतोय, मूख्यमंत्र्यांच  मंत्री ऐकत नाही, उपमुख्यमंत्री मंत्र्यांच ऐकत नाही सगळयांच्या दिशा वेगवेगळया ठरल्या आहेत. 28 जण 28 दिशेला तोंड उभे करून  राहिलेले हे मंत्रिमंडळ असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -