घरमहाराष्ट्र१ लाख १० हजार पर्यटकांची 'कास' पठाराला भेट!

१ लाख १० हजार पर्यटकांची ‘कास’ पठाराला भेट!

Subscribe

गस्ट ते आॅक्टोबर या कालावधीतील सुमारे ५० दिवस कास पठारावर फुलांचा हंगाम चालतो.

जैवविविधतेचा समृद्ध वारसा लाभलेल्या कास पठारावर यंदाच्या मौसमात सुमारे एक लाख दहा हजार पर्यटकांनी भेट दिली. यापैकी सुमारे ४५ हजार पर्यटकांनी ‘आॅनलाईन बुकिंग’ सुविधेचा लाभ घेतला. नियंत्रित पर्यटनामुळे यावर्षी वाहतूक कोंडीचा एकही प्रकार कास रस्त्याला घडला नाही. पर्यटकांचे लोंढे ते नियंत्रित पर्यटन असा कासचा प्रवास निश्चितच आशादायक चित्र दर्शविणारा आहे. आॅगस्ट ते आॅक्टोबर या कालावधीतील सुमारे ५० दिवस कास पठारावर फुलांचा हंगाम चालतो. युनेस्कोने जागतिक निसर्ग वारसास्थळाचा दर्जा दिल्यामुळे महाराष्ट्र आणि देशातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटकांचे पाय या हंगामात कास पठाराकडे वळतात. उपलब्ध आकडेवारीनुसार २०१६ मध्ये एक लाख ४० हजार, २०१७ मध्ये एक लाख आणि यंदाच्या हंगामात एक लाख ५ हजार पर्यटकांनी कासला भेट दिली. शनिवार-रविवार तसेच शासकीय सुटीच्या दिवशी १५ ते २० हजार पर्यटकांची पठारावर गर्दी असे. या लोंढ्यांना आवरणे स्थानिक कर्मचारी व वन विभागासाठी अशक्य कोटीतील गोष्ट होती. पर्यटकांच्या लोंढ्यांचा कासच्या धारण क्षमतेवर ताण येत होता. शिवाय सातारा-कास रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन पर्यटकांच्या गैरसोयीत भर पडत होती.

ऑनलाईन बुकिंगवर भर

कासच्या जैवविविधतेचे रक्षण-संवर्धनासाठी नियंत्रित पर्यटनावर वनविभागाने जोर दिला. एका दिवसाला तीन हजारांपेक्षा अधिक पर्यटकांना पठारावर प्रवेश देऊ नये, अशी स्वयंशिस्त लावण्याचा प्रयत्न तत्कालीन उपवन संरक्षक अनिल अंजनकर यांनी केला. यावर्षी नूतन उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांनी या उपक्रमाला बळ दिले. टप्प्याटप्प्याने का होईना हा प्रयोग जनमाणसात रुजू लागला आहे. वन विभागाकडील उपलब्ध आकडेवारीनुसार, २०१६ मध्ये ५० हजार ७३६, २०१७ मध्ये ३३ हजार ९३१ तर २०१८ च्या हंगामात ४२ हजार ६१४ पर्यटकांनी आॅनलाईन बुकिंग करून कासची शिस्त पाळण्याचा प्रयत्न केला. 


वाचा: कोकण नैसर्गिक र्‍हासाकडे…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -