Homeताज्या घडामोडीLadki Bahin Yojna Fraud : लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची नावं, नेमकं...

Ladki Bahin Yojna Fraud : लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची नावं, नेमकं प्रकरण काय?

Subscribe

महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून 2 कोटींहून अधिक महिलांना लाभ मिळाला. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 7 हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांना मिळाली आहे. त्यानुसार, एका लाभार्थी महिलेला 10 हजार 500 रुपयांची रक्कम मिळाली आहे.

Ladki Bahin Yojna Fraud मुंबई : महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून 2 कोटींहून अधिक महिलांना लाभ मिळाला. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 7 हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांना मिळाली आहे. त्यानुसार, एका लाभार्थी महिलेला 10 हजार 500 रुपयांची रक्कम मिळाली आहे. मात्र, हि योजना मागील काही दिवसांपासून बोगस अर्जांमुळे चर्चेच्या केंद्र स्थानी आहे. अशात परराज्यातील महिला या योजनेचा लाभ घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ladki bahin yojana fraud infiltration of out of state beneficiaries in schem many applications through bogus login)

नेमकं प्रकरण काय?

लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचं दाखवून बोगस लॉगिन आयडी तयार करत परराज्यातील तब्बल 1171 अर्ज लाडकी बहीण योजनेत दाखल झाले. या अर्जांची छाननी केली असता ज्यांनी अंगणवाडी सेविका असल्याचं दाखवून अर्ज केले, ते उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगाल आणि राजस्थान मधील असल्याचे पोलीस, महसूल आणि महिला बाल विकास विभागाच्या तपासात समोर आले आहे. याबाबत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, ज्या दोन लॉगीन वरून 111 अर्ज दाखल झाले आहेत, त्यापैकी 22 अर्ज हे एकट्या बार्शी तालुक्यातील असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणज एकूण 22 अर्ज हे खोट्या कागदपत्रांच्या आधारे भरल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, 4 ऑक्टोबर 2024 रोजी या प्रकरणी बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेत बोगस अर्ज वाढले असून लातूर सांगली जिल्ह्याच्या नावाने लॉगिन आयडी बनवून परराज्यातील लाभार्थ्यांचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचे लॉगिन आयडी बनवून तब्बल 1171 अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे 1171 अर्ज म्हणजे 12,295,500 एवढी रक्कम या खात्यांमध्ये जमा झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, 1171 अर्जांमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत परराज्यातील बोगस लाभार्थ्यांचे रॅकेट समोर आले आहे. यामध्ये लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचे दाखवत केवळ दोन लॉगिन वरून वेगवेगळ्या जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांच्या नावाखाली 1171 अर्ज दाखल झाले. मात्र, प्रत्यक्षात हे उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थान मधील असल्याचे समोर आलं आहे.


हेही वाचा – Sanjay Raut : ठाकरे-भाजपा एकत्र येणार, चंद्रकांत पाटलांशी होतेय जवळीक; नेमकं काय म्हणाले राऊत?