‘लालबागचा राजा’ मंडळाकडून पूरग्रस्तांना २५ लाखांची मदत

'लालबागचा राजा' या मंडळाने पूरग्रस्तांसाठी केलेली मदत ही मुख्यमंत्री निधीत जमा केली जाणार आहे. तसेच या मंडळाने एक गाव दत्तक घेतलं आहे.

lalbaugcha raja mandal to give 25 lakhs for flood hit relife
'लालबागचा राजा' मंडळाकडून पूरग्रस्तांना २५ लाखांची मदत

महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात महापूराचे एक भीषण रुप पाहायला मिळालं. पण या महापूरने सांगली आणि कोल्हापूरतील नागारिकांचे आयुष्य उद्धवस्त करून टाकलं आहे. त्यामुळे पूरग्रस्तांसाठी अनेक मदतीचे हात देण्यास सरसावले आहेत. मराठी कलाकारांनीही यात सहभाग घेतला आहे. आता पूरग्रस्तांसाठी मुंबईतील लोकप्रिय गणेश मंडळानी देखील मदत केली आहे. ‘लालबागच्या राजा’ मंडळाने २५ लाख तर ‘चिंचपोकळी चिंतामणी’ मंडळाने ५ लाख रुपयांची मदत केली आहे.

काही दिवसांपूर्वी सार्वजनिक समन्वय समितीनं सजावटीवरील अनावश्यक खर्च टाळून मुंबईतील गणेश मंडळानी पूरग्रस्तांना मदत द्यावी, असं आवाहन केलं होतं. या आवाहनाला मुंबईतील लालबागचा राजा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळांनी प्रतिसाद दिला.

ही मदतीची रक्कम मुख्यमंत्री निधीत जमा केली जाणार आहे. रायगडमधील जुई गावच्या धर्तीवरील एक संपूर्ण गाव लालबागचा राजा मंडळाने दत्तक घेऊन त्याचे पुनर्वसन करणार आहे. ही मदत देणाऱ्या संस्था, संघटनांची नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टि्वटरवर जाहीर केली आहेत.


हेही वाचा – पूरग्रस्तांना ५०० घरं बांधून देणार नाना पाटेकरांचे आश्वासन


उर्मिला मातोंडकर देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली

मनसे कडून बॉलिवूड कलाकारांवर टीक झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटी पुढे आले आहेत. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही उत्तर मुंबईतील काही काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत आज मिरज, इचलकरंजी आणि कोल्हापूरच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना झाली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्ताने पूरग्रस्तांना मदत करूया. तसेच कोणताही मदत ही लहान आणि मोठी नसते. त्या मदतीच्या मागची भावना श्रेष्ठ असते, असं तिने आवाहन केलं आहे.