घरमहाराष्ट्रपुणेललित पाटील प्रकरण हिवाळी अधिवेशनात मांडणार; काँग्रेस आमदाराचे सरकारवर टीकास्त्र

ललित पाटील प्रकरण हिवाळी अधिवेशनात मांडणार; काँग्रेस आमदाराचे सरकारवर टीकास्त्र

Subscribe

पुणे : ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांनी नाशिकच्या ललिट पाटीलला अटक केली आहे. नऊ महिने ससून रुग्णालयातून ड्रग्ज तस्करी करत असल्याचा आरोप ललिट पाटीलवर आहे. याप्रकरणी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांचे नाव समोर आले आहे. त्यामुळे विरोधकांकडून सरकारला सातत्याने लक्ष केले जात आहे. मात्र या प्रकरणात सरकारने नेमलेल्या समितीचा अहवालनंतरही अद्यापही कारवाई झालेली नाही. याचपार्श्वभूमीवर आमदार रवींद्र धंगेकर यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच हे प्रकरण हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचेही सांगितले. (Lalit Patil will present the case in the winter session Criticism of Congress MLA Ravindra Dhangekar on Govt)

रवींद्र धंगेकर म्हणाले की, 27 ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयासंदर्भातील राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल आहे. मात्र त्यानंतर तो अद्यापही प्रसिद्ध झालेला नाही. या प्रकरणात राज्य सरकार अधिष्ठाता संजीव ठाकूर यांना पाठिशी घालत आहे. ललित पाटील प्रकरणात त्यांचा सहभाग स्पष्ट दिसत आहे. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. ललित पाटील यांच्याकडून पैसे घेऊन संजीव ठाकूर यांनी त्याला नऊ महिने ससून रुग्णालयात पंचातारांकीत सुविधा दिल्याचा आरोपही रवींद्र धंगेकर यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांसाठी सर्वपक्षीय ऑर्केस्ट्रा ठेवू; ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर राऊतांची प्रतिक्रिया 

ललित पाटील प्रकरण थंड करण्याचा प्रयत्न

राज्य सरकारने ललित पाटील प्रकरणात नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर अद्यापपर्यंत एकाही पोलिसांवर कारवाई झालेली नाही. अनेक लोकांनी यामध्ये पैसे, सोने घेतले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र त्यानंतरही काहीच कारवाई होत नाही. ललित पाटील प्रकरण थंड करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप करतानाच हे प्रकरण हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले.

- Advertisement -

कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालयात जाणार

ललित पाटील प्रकरणात सरकारकडून कारवाई झाली नाही तर आपण उच्च न्यायालयात जाणार इशारा रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे. तसेच ललित पाटील फरार झाल्याप्रकरणी तपासाला गती मिळाली नसल्यामुळे मी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. तपास सुरू आहे तो होऊ द्या, असे त्यांनी म्हटले आहे. परंतु या प्रकरणात जे पोलीस आणि ससून रुग्णालयाचे आधिकारी दोषी त्यांना अटक करा आणि समितीचा अहवाल प्रसिद्ध करा, अशी मी केली असल्याचे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

हेही वाचा – त्यांचे खबरी त्यांना अडचणीत आणतील; राऊतांच्या ‘त्या’ शब्दावर शिंदे गटाचे जोरदार प्रत्युत्तर

तपास केंद्रीय यंत्रणेकडे द्यावा

ससूनच्या कॅन्टीनमधून ड्रग्स विकले जात होते, असा आरोप करताना रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणी जे दोषी आहेत, त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात कारवाई झाली नाही तर आपण पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच हा सगळा तपास केंद्रीय यंत्रणेकडे द्यावा. कारण राज्य सरकार यावर काम करणार नाही, अशी भूमिकाही रवींद्र धंगेकर यांनी मांडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -